Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये प्रत्येक आठवड्यात घरात नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा घरात ‘जंगलराज’ ही थीम आहे. या थीमनुसार घरात पहिल्या दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. आता सध्या घरातील गॅस कनेक्शन ‘बिग बॉस’कडून बंद करण्यात आल्याने सदस्यांना बीबी करन्सी मिळवण्यासाठी प्राणी ओळखण्याचा नवा टास्क देण्यात आला आहे.

‘बिग बॉस’ने सदस्यांना एक अनोखा टास्क दिला आहे. घरातील एका सदस्याला अभिनय करायचा आहे, तर समोरच्या सदस्याला प्राण्याचं नाव ओळखून तो प्राणी ‘बिग बॉस’ने तयार केलेल्या जंगलातून शोधून आणायचा आहे. मंगळवारच्या भागात या टास्कच्या तीन फेऱ्या पार पडल्या. पहिल्या फेरीत पॅडी आणि संग्रामने २० हजार रुपये बीबी करन्सी कमावली. तर, दुसऱ्या फेरीत धनंजय-वर्षाने ३० हजार बीबी करन्सी मिळवली. यानंतर तिसऱ्या फेरीत सहभागी झालेल्या जान्हवी-अरबाजला टाकीतील पाणी कमी झाल्यामुळे शून्य रुपये करन्सी मिळवता आली. त्यामुळे आता उर्वरित दोन जोड्यांवर जास्तीत जास्त करन्सी कमावण्याचा तणाव असणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’ने बंद केलं घरचं गॅस कनेक्शन! घरात सुरू झाला अनोखा टास्क अन् अरबाज-जान्हवीची झाली ‘अशी’ फजिती

सदस्यांनी कमावलेल्या करन्सीनुसार ‘बिग बॉस’ घरातील गॅस विशिष्ट कालमर्यादेसाठी सुरू करतील. त्यानंतर पुन्हा एकदा गॅस कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ७ तासांचा वेळ बाकी राहिलेला असताना जान्हवी सर्वांना पटापट काम करा असं सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : लेकीला पाहून आर्याच्या आईला अश्रू अनावर…; ‘बिग बॉस’ने घराबाहेर काढलं, पण अमरावतीत जल्लोषात स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : वर्षा-निक्कीमध्ये वाद

Bigg Boss Marathi : वर्षा-निक्कीमध्ये पुन्हा वाद

एकीकडे घरातील सगळे सदस्य जेवणासाठी घाई करत असताना दुसरीकडे, वर्षा-निक्कीमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षा उसगांवकर आणि निक्कीमध्ये गरम पाण्यावरून जुंपली आहे. वर्षा तिला, “गरम पाणी कुठेय विचारतात” यावर निक्की म्हणते, “इथे केलं होतं ना गरम पाणी” यानंतर वर्षा तिला “राइचा पर्वत करायची सवय झालीये” असं म्हणतात. पुढे, अरबाज “गरम पाणी तिथे फेकलं” असं म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या भागात सदस्यांची कशी धांदल उडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.