‘बिग बॉस हिंदी’चं पहिलं ओटीटी पर्व सुपरहिट ठरल्यानंतर आता या शोचं दुसरा ओटीटी पर्व सुरू झालं. हे पर्व सुरू झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसापासूनच या स्पर्धकांमध्ये चांगलीच भांडणं होताना दिसत होती. तर या कार्यक्रमात अभिनेता जैद हदीद आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांनी एकमेकांना लिपलॉक किस केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तर आता जैद हदीदने यावर भाष्य केलं आहे.

बिग बॉस ओटीटी सीझन २ आता अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे. अलीकडेच, या पर्वात दुहेरी एलिमिनेशन झालं आणि त्यात ज्यामुळे जैद हदीद आणि अविनाश सचदेवा यांना शोमधून बाहेर काढण्यात आलं. जैद बिग बॉसच्या घरात जवळपास ७ आठवडे होता. त्याच्या काही गैरकृत्यांमुळे तो खूप चर्चेत आला. शोमधून बाहेर आल्यानंतर जैदने रिअॅलिटी शोमध्ये काही गोष्टी बोलल्याबद्दल आणि कृतीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : Video: एकमेकांच्या जवळ गेले अन्…; ‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी सर्वांसमोर एकमेकांना केलं लिपलॉक किस

‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत ‘बिग बॉस ओटीटी २’मधील त्याची सह-स्पर्धक आकांक्षा पुरीला ‘बॅड किसर’ म्हणण्याबद्दल उघडपणे बोलला. शोमधून बाहेर आल्यानंतर त्याने यु टर्न घेतला आहे आणि आता त्याने आकांक्षाचं वर्णन ‘फॅब्युलस किसर’ असं केलं आहे.

हेही वाचा : मराठी चित्रपटात झळकलेली ‘ही’ आघाडीची अभिनेत्री दिसणार ‘Bigg Boss OTT 2’मध्ये, सलमान खान करणार सूत्रसंचालन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो म्हणाला, “आकांक्षा वाईट चुंबन घेणारी आहे असे मी म्हणालो याचा मला दुःख वाटतं. मी असं बोलायला नको होतं. आकांक्षा, जर तू हे पाहत असशील तर मला खरोखर माफ कर.तू एक सुंदर स्त्री आणि एक उत्तम किस करणारी आहेस आणि मला ते मान्य करावं लागेल. मी मूर्ख होतो. मी याचा विनोद करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्ही लवकरच भेटू आणि गोष्टींवर चर्चा करू.”