‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व सध्या फारच गाजतंय. या घरात रोज काही ना काही वाद होत असतात. आता या घरातील काही स्पर्धकांमध्ये वैर तर काहींमध्ये मैत्री झालेली दिसत आहे. अशातच या घरात एका नव्या सदस्याची एंट्री होणार आहे. एक लोकप्रिय अभिनेत्री ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून सहभागी होणार आहे.

‘बिग बॉस १६’ची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी निर्माते दरवेळी नवीन शक्कल लढवताना दिसतात. आधी या घराचे शिव ठाकरे आणि अर्चना गौतमचे भांडण गाजले आणि आता बिग बॉस वाइल्ड कार्ड एंट्री चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’ मधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकच नाही तर स्पर्धकही उत्सुक आहेत. अखेर हे गुपित समोर आलं आहे.

आणखी वाचा : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात जाऊन घेतली शिक्षिकेची पदवी, म्हणाली…

रिपोर्ट्सनुसार, बाहेर काढलेल्या स्पर्धकांपैकी कोणीही परत येणार नाही. तर एक नवीन स्पर्धक बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस OTT फेम रिद्धिमा पंडित ‘बिग बॉस १६’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश करणार आहे. रिद्धिमा पंडितची या शोमधील एंट्री जवळपास निश्चित मानली जात आहे. पण वाईल्ड कार्ड एन्ट्री या वीकेंडला होणार की या आठवड्यातच अचानक रिद्धिमा या घरात प्रवेश करत घरातील इतर सदस्यांना सरप्राईज देणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा : Bigg Boss Ott- रिद्धिमा पंडित राकेश बापटला म्हणाली “तू तर शमिताचा….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिद्धिमा पंडितने ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर रिद्धिमाने ‘यो की हुआ ब्रो’, ‘आय एम बिकॉज ऑफ अस’, ‘हैवान द मॉनस्टर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. रिद्धिमा पंडित बिग बॉस ओटीटीमध्ये देखील सहभागी झाली होती परंतु ती लवकरच ती त्यातून बाहेर पडली.