बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस १६’ मध्ये दिसत आहे. त्याची या शोमध्ये एंट्री होताच त्याच्यावर ४ वर्षांपूर्वी लावले गेलेले लैंगिक शोषणाचे आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत. तो या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे ‘बिग बॉस’चे निर्माते तसेच होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. साजिदवर सुमारे १० महिलांनी अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला होता. अनेक नामवंत व्यक्तींनी त्याला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. प्रेक्षकांचा रोष आणि साजिदवर होणारे गांभीर आरोप यांच्यामुळे या शोच्या निर्मात्यांवर त्याला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यासाठी दबाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण परिस्थितीचा विचार करून ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी साजिद खानबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागावरून नवा वाद सुरू; नेमकं कारण काय?

मीडिया रिपोर्टनुसार लवकरच साजिद खानला ‘बिग बॉस’मधून बाहेर काढले जाणार असल्याचे समोर येत आहे. ‘ईटाइम्स’ने त्यांच्या एका वृत्तात सांगितले की, एका आठवड्याच्या आतमध्येच साजिद खानला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे बिग बॉसशी संबंधित एका जवळच्या सूत्राने संकेत दिले आहेत. सलमान खाननेही ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांच्या या निर्णयाला सहमती दर्शवली आहे, असे बोलले जात आहे.

या वृत्तमध्ये सलमान खानच्या एका जवळच्या मित्राने असे म्हटले आहे की, “सलमान खानसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कारण तो साजिदची बहीण फराह खानच्या खूप जवळचा आहे. स्वत: फराहनेही गेल्या काही सीझनमध्ये सलमानच्या अनुपस्थितीत हा शो होस्ट केला होता. या शोमध्ये साजिदच्या एंट्रीसाठी फराह खान मैदानात उतरली होती. या प्रकरणी तिने सलमानकडे मदत मागितली होती आणि मित्र असल्याने सलमाननेही तिची साथही केली. पण साजिदला ‘बिग बॉस’मध्ये घेण्याच्या निर्णयाचा इतका वाईट परिणाम होईल याची त्याला कल्पनाही नव्हती.”

दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. FWICE संस्थेने साजिद खानवर बंदी घातली. ‘हिम्मतवाला’ ‘हमशकल्स’ सारखे अपयश दिल्यानंतर, साजिद खान ‘हाऊसफुल ४’मधून पुनरागमन करणार होता. तथापि, अशा आरोपांमुळे साजिदला या चित्रपटातून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचा ताबा घेतला.

हेही वाचा : Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून उर्फी जावेदनेही संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मंदाना करिमी हिने साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरात झालेली एन्ट्री पाहून बॉलिवूडला रामराम ठोकला. मंदाना करिमीने साजिद खानवर MeToo मोहिमे अंतर्गत गंभीर आरोप केले होते.