‘मास्टरशेफ इंडिया’ने देशभरातील लाखो लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. हा कुकिंग रिअ‍ॅलिटी शो खाद्यप्रेमींचा सर्वात लाडका कार्यक्रम असून आता ‘मास्टरशेफ इंडिया’च्या आगामी सीझन लवकर सुरू होणार आहे. पण या सीझनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला. नव्या परीक्षकाची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा – “मी माझीच सांभाळू शकत नाही अन्….” चाहत्यानं पत्नीच्या समस्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर किंग खानचं उत्तर; म्हणाला…

मागील ‘मास्टरशेफ इंडिया’ सातव्या सीझनमध्ये शेफ विकास खन्ना, शेफ रणवीर ब्रार आणि शेफ गरिमा अरोर हे तिघं परीक्षण करत होते. पण आता गरिमा अरोर हिच्या जागी पूजा धिंग्रा पाहायला मिळणार आहे. सातव्या सीझनमध्ये पाहुणी परीक्षक म्हणून पूजाने प्रवेश केला होता. आता ‘मास्टरशेफ इंडिया’च्या आगामी सीझनमध्ये शेफ विकास खन्ना, शेफ रणवीर ब्रार यांच्याबरोबर ती परीक्षकाच्या भूमिकेत उतरणार आहे.

हेही वाचा – सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेला फ्लॅट ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला विकत? तीन वर्षांपासून होता बंद

हेही वाचा – सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “शेवटी सर्वांना…”

शेफ पूजाने आपला उत्साह व्यक्त करत म्हटले, “‘मास्टरशेफ इंडिया’ हे होम शेफसाठी एक अतुलनीय व्यासपीठ आहे. स्वयंपाकातील दिग्गज शेफ विकास खन्ना आणि शेफ रणवीर ब्रार यांच्याबरोबर ‘मास्टरशेफ इंडिया’ची परीक्षक म्हणून सामील होताना मला आनंद होत आहे.”

हेही वाचा – प्रसाद ओकच्या ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार गौरव मोरे; फिल्टरपाड्याच्या बच्चनने स्वतः केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे पूजा म्हणाली की, “या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सामील होण्याची आणि शेफ विकास, शेफ रणवीर यांसारख्या उल्लेखनीय मार्गदर्शकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली आहे. यासाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. आम्ही एकत्रितपणे नाविन्यपूर्णतेला प्रेरणा देण्याचे आणि पाककला मास्टर्सच्या पुढील पिढीचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवून परीक्षण करू. ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाची प्रेक्षकांप्रमाणेच आम्हाला देखील उत्सुकता आहे.”