आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरंल. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऋतुराज गायकवाडने काही दिवसांपूर्वी पत्नी उत्कर्षाबरोबरचा फोटो पोस्ट केला होता. आता त्यावर आणखी एका मराठी अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा बसली आहे. “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकतंच ऋतुराजच्या फोटोवर कमेंट केली आहे. “आयपीएलमधील विजयाबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुझ्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा”, असे गौतमीने म्हटले आहे.

gautami deshpande comment
गौतमी देशपांडे

आणखी वाचा : एम.एस.धोनी आणि जडेजाचा फोटो पोस्ट करत अनुष्का शर्माची पोस्ट, म्हणाली…

ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षाबरोबर जाहीरपणे फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही.