कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या विनोदी शैलीसाठी खूप लोकप्रिय आहे. ‘द कपिल शर्मा शो’ने त्याला वेगळी ओळख दिली. आज तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आता त्याची एकूण संपत्ती किती हे त्याने स्वतः सांगितलं आहे.

जानेवारी २०२१ मध्ये कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये सांगितलं होतं की तो वर्षाला १५ कोटी रुपये कर भरतो. इतकंच नाही तर तो त्याच्या शोच्या एका एपिसोडसाठी जवळपास ५० लाख रुपये घेतो. कपिलची एकूण संपत्ती ३०० कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. आता याबाबत त्याला एका मुलाखतीत विचारलं गेलं असता याचं त्याने हसत हसत उत्तर दिलं.

आणखी वाचा : मुकेश व नीता अंबानींनी लेकीच्या जुळ्या मुलांना दिली मोठी भेट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

कपिल शर्मा त्याच्या ‘झ्विगाटो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानिमित्ताने सध्या तो अनेक मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की, “त्याची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपये आहे का?” यावर उत्तर देताना तो हसला आणि म्हणाला, “मी खूप पैसे गमावलेही आहेत. पण खरं सांगायचं तर मी या सगळ्याचा विचार करत नाही. माझ्याकडे घर आहे, कार आहे, माझं कुटुंब आहे आणि माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. अर्थात, मी संत नाही. मी चांगले पैसे नाकारणार नाही. पण मी पगाराचा विचार करणारा माणूस आहे.” आता त्याचं हे उत्तर खूप चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : “‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान त्याचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यात त्याने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नंदिता दासने केलं असून कपिल शर्माच्याबरोबरीने गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही दाखवण्यात आला आहे.