अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या शिझान खानला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने शिझानला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या आरोपाखाली शिझानला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता.

पत्नीशी वादांमुळे चर्चेत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘या’ अभिनेत्रींबरोबर होते अफेअर; महिला वेटरसह वन नाइट स्टँड, आत्महत्येचा विचार अन्…

तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवरच गळफास लावत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आई वनिता शर्माच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली होती. शिझान व तुनिषा सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होते. तुनिषाच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तेव्हापासून शिझान खान कोठडीत होता. आता कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता.

पत्नी व भावांबरोबर संपत्तीचा वाद सुरू असताना नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला मोठा निर्णय; मूळ गावी पोहोचला अन्…

दरम्यान, आत्महत्या करणारी तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.