‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दिव्या अग्रवालने नुकतंच तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर साखरपुडा उरकला आहे. तिने स्वत: याबद्दलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. दिव्याने शेअर केलेल्या या फोटोतील अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालने ५ डिसेंबरला तिचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार यांच्याबरोबर ३० वा वाढदिवस साजरा केला. दिव्याने वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. यात अनेक टीव्ही कलाकार सहभागी झाले होते. अभिनेता वरुण सूदशी ब्रेकअप झाल्यानंतर दिव्या अग्रवालने तिच्या वाढदिवशी मराठमोळ्या बिझनेसमॅन असलेल्या अपूर्व पाडगावकरबरोबर साखरपुडा केला आहे. याचे फोटोही तिने शेअर केले आहेत.
आणखी वाचा : वरुण सूदबरोबर ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने मराठमोळ्या बिझनेसमनशी केला साखरपुडा; पोस्ट चर्चेत

दिव्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने अधिकृतरित्या बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरबरोबरचे दिव्या तिच्या नात्याची कबुली देताना दिसत आहे. दिव्याच्या ३० व्या वाढदिवसाचे निमित्त साधत अपूर्वने तिला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोज केलं आहे. या फोटोंमध्ये तिने अपूर्वबरोबर रोमँटिक पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“मी कधी हसणं बंद करू शकेन का? कदाचित नाही. माझ्या आयुष्यात प्रकाशाचा आणखी एक किरण आला आहे आणि आयुष्याचा हा प्रवास शेअर करण्यासाठी मला एक योग्य व्यक्ती मिळाली आहे. त्याची बायको, हे कायमचं वचन आहे. यापुढे मी कधीच एकटी चालणार नाही.” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. या पोस्टमध्ये तिने तिची अंगठीही दाखवली आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात बहरलेलं नातं, हातावर टॅटू अन् ब्रेकअप; शिव ठाकरे-वीणा जगतापची लव्हस्टोरी

अपूर्व पाडगावकरने दिव्या अग्रवालला दिलेली ही अंगठी फारच हटके डिझाईनची आहे. या अंगठीवर मराठीत ‘बाय’ आणि इंग्रजीत ‘CO’ असे लिहिण्यात आले आहे. याचाच अर्थ त्यावर त्याने ‘बायको’ असे लिहिले आहे. दिव्या अग्रवालच्या या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे तिची ही अंगठी फारच वेगळी आहे. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा : दिव्या अग्रवालच्या साखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दिव्या अग्रवाल यापूर्वी सुरुवातीला अभिनेता प्रियांक शर्माला डेट करत होती. पण जेव्हा प्रियांक बिग बॉस ११ मध्ये सहभागी झाला तेव्हा त्यांची हिना खानशी चांगली मैत्री झाली. त्यावेळी दिव्याने प्रियांकशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर दिव्याने वरुण सूदला डेट करायला सुरुवात केली. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघंही लग्न करतील अशी चर्चा असतानाच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आता अखेर तिने अपूर्व पाडगावकरबरोबर साखरपुडा केला आहे. ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.