Gauri Kulkarni Answer Fan;s Question : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर आपले दैनंदिन अपडेट्स शेअर करत कलाकार मंडळी चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर अनेक कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून लग्न कधी करणार असे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यात अभिनेत्रींना तर असे अनेक प्रश्न येत असतात.
अशातच छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीला चाहत्याने लग्नाविषयीचा प्रश्न विचारला. ही अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी. गौरीनं याआधी अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, ‘आई कुठे काय करते’ने तिला अधिक लोकप्रियता मिळाली. गौरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते.
तसंच गौरी सोशल मीडियावर तिचे अनेक डेली ब्लॉगही शेअर करताना दिसते. गौरीच्या या व्हिडीओमधून तिचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतो. याच मजेशीर अंदाजात तिनं चाहत्याच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. गौरीनं नुकताच तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आणि या संवादादरम्यान एका चाहत्याने तिला लग्नाविषयीचा प्रश्न विचारला.
इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटमध्ये चाहत्याने तिला लग्नाचा काही विचार आहे का नाही? असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला गौरीनं मजेशीर अंदाजात उत्तर देत म्हटलं, “आहे पण आणि नाही पण…” तसंच तिला तिच्या आगामी कामाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. टीव्हीवर पुन्हा कधी बघायला मिळेल असा प्रश्न विचारला, ज्यावर गौरीने ‘टीव्हीवर पुन्हा काम करायला मिळावं, यासाठी देवाकडे प्रार्थना करणं सुरू आहे’ असं उत्तर दिलं.
लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नाला गौरी कुलकर्णीचं उत्तर

यासह गौरीला ‘बिग बॉस’मध्ये जाणार का असा प्रश्नही एका चाहत्याने विचारला. यावर गौरी तिच्या मजेशीर अंदाजात म्हणाली, “मी १२ तास झोपते, त्या शोमध्ये गेली तर ते म्हणतील घरीच झोप.” दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये तिनं यशच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती. या मालिकेनंतर ती ‘प्रेमास रंग यावे’ मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
