अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सारे तुझ्याकसाठी’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तर नंतर ‘माझा होशील ना’ या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली. आज तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिची एक इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
गौतमी सोशल मीडियावर सक्रिय राहून आजूबाजूला घडत असणाऱ्या तिला आवडणाऱ्या त्याचबरोबर तिला खटकणाऱ्या गोष्टींबद्दल बिनधास्तपणे व्यक्त होत असते. तर आता इन्स्टाग्रामवरून तिने सिग्नल तोडणाऱ्या बस चालकांबद्दल भाष्य करत पुणे ट्रॅफिक पोलिसांचं त्याकडे लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : गौतमी देशपांडेचा तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, बॉयफ्रेंडचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

गौतमीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये गौतमी कारमधून प्रवास करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “मी मुकुंद नगर म्हणजेच आपण ज्याला पुण्यातील लक्ष्मी नारायणचा चौक म्हणतो तिथून गेले. जेव्हा जेव्हा मी तिथून जाते तेव्हा तेव्हा मला कुठल्या ना कुठल्या मोठ्या गाड्या, पीएमटी बसेस, ट्रॅव्हलच्या बसेस या नेहमी सिग्नल तोडताना दिसतात. तिथे ट्रॅफिक पोलीस आहेत की नाही हे मला माहीत नाही. पण जर तिथे नसतील तर कृपया तिथे ते असावेत अशी इच्छा आहे. कारण रोज इतक्या मोठ्या गाड्या, पीएमटीच्या बसेस तिथे सिग्नल तोडत असतात तर असं वाटतं की सरकारच्याच गाड्यांनी जर सिग्नल मोडले तर काय!”
हेही वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…
पुढे ती म्हणाली, “समोरून इतक्या मोठ्या गाड्या येत असताना तुम्हाला काही इलाज नसतो. तुमचा सिग्नल सुरू असला तरीही तुम्हाला थांबावं लागतं. त्यामुळे कृपया याकडे लक्ष दिलं जावं. तिथे सीसीटीव्ही बसवा आणि किती लोक सिग्नल तोडतात ते पहा. कृपया याकडे लक्ष द्या.” तसंच या स्टोरीमध्ये तिने पुणे ट्रॅफिक पोलिसांनाही टॅग केलं आहे.