Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला आहे. दोन दिवसांपूर्वी दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता ही लोकप्रिय जोडी जवळचे नातेवाईक व मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकली आहे.

अभिनेता सारंग साठ्येने गौतमी-स्वानंदच्या लग्नातील काही इनसाइड फोटो इन्स्टाग्राम शेअर करत या जोडीला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांनी लग्नासाठी खास पारंपरिक लूक केला होता.

हेही वाचा : Video: संगीत सोहळ्यात गौतमी देशपांडेचा होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटिक डान्स, आईने गायलं खास गाणं

gautami
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर

गौतमीने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती. तर, स्वानंदने बायकोला मॅचिंग अशी ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. सारंगने दोघांचा सप्तपदी घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : पुण्यातील ‘या’ आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकरचं लग्न, एका दिवसाचं भाडं किती माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या गौतमी देशपांडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावरील मालिका ‘माझा होशील ना’मुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय सध्या गौतमी ‘गालिब’ या नाटकांत प्रमुख भूमिका साकारत आहे. तसेच स्वानंदच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तो ‘भाडिपा’चा व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहत आहे.