अनेक मराठी कलाकार आपलं अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत व्यवसाय करताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाकार स्वतःचा नवनवीन व्यवसाय सुरू करताना पाहायला मिळत आहेत. आता यामध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे नाव देखील सामिल झालं आहे. रेश्मा शिंदेने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. रेश्मा अभिनेत्रीसह व्यावसायिका झाली आहे. आज ( २१ सप्टेंबर ) रेश्माने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विशेष म्हणजे तिच्या व्यवसायाचा संबंध बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरशी आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत नवा व्यवसाय सुरू करत असल्याचं जाहीर केलं. पालमोनास या ब्रँडशी भागीदारी करून रेश्माने स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे. आजच या ज्वेलरीच्या स्टोअरचं उद्घाटन झालं. पुण्यातील कोथरुड येथे रेश्माने स्वतःचं ज्वेलरीचं स्टोअर उघडलं आहे.

हेही वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या नाटकाला कतारमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अनुभव सांगत म्हणाला, “परभणीच्या काद्राबादमध्ये राहायचो तेव्हा…”

यासंदर्भात ती व्हिडीओत म्हणाली की, हॅलो पुणेकर, पुण्यात कायम येणं-जाणं होतं असतं. पण आता यावेळेस मी कायमचं असोसिएशन पुण्याबरोबर जोडलं आहे. मी पुण्यात ज्वेलरीचं स्टोअर उघडलं आहे. पालमोनासबरोबर मी भागीदारी केली आहे. पालमोनास हे भारतातील पहिलं डेमिफाइन ज्वेलरी ब्रँड आहे. ती ज्वेलरी कशी आहे हे पाहण्यासाठी माझ्या स्टोअरला नक्की भेट द्या.

श्रद्धा कपूरचं काय कनेक्शन?

रेश्मा शिंदेने पुण्यात उघडलेलं ज्वेलरी स्टोअर हे पालमोनास या ब्रँडची फ्रेंचाइजी आहे. या ब्रँडची को-फाउंडर श्रद्धा कपूर आहे. त्यामुळे श्रद्धाने रेश्माने उघडलेल्या स्टोअरची इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. श्रद्धाने रेश्माच्या नव्या ज्वेलरी स्टोअरचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “पुणेकरांनो ऐका, आम्ही नवीन पालमोनासचं स्टोअर उघडलं आहे. या आनंदात फक्त आज स्टोअरमध्ये एकावर एक ज्वेलरी फ्री आहे. आता बोलू नका मी सांगितलं नाही म्हणून…”

हेही वाचा – घनःश्याम दरवडेला ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्यासाठी कुटुंबाने दिला होता नकार, मोठ्या बहिणीने सांगितलं कारण, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Shraddha Kapoor Story
Shraddha Kapoor Story

दरम्यान, अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी भूमिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस पडली आहे. याआधी रेश्मा ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली दीपा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. याशिवाय रेश्माने ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘लगोरी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.