मोबाइलमधील ऑनलाइन पेमेंटमुळे फसवणूक, स्कॅमसारख्या गोष्टी हल्ली सर्रास घडताना दिसतात. एका क्लिकमुळे अनेकांचे लाखो रुपये गेल्याचे किस्से अनेकदा कानावर येत असतात. या सगळ्याला कोणीच अपवाद नसतं. थोडसं दुर्लक्ष आणि हजारोंचं नुकसान असं झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. अशातच असंच काहीसं छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या अभिनेत्यासह घडलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘उदे गं अंबे’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारलेला अभिनेता गिरीश परदेशीने त्याच्या घरातही हा स्कॅम करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं आहे.

गिरीश परदेशीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणाला, “मित्रांनो, एक धोक्याची सूचना आहे. आता थोड्यावेळापूर्वी माझ्या पत्नीच्या म्हणजेच प्रतीक्षाच्या फोनवर एका बाईने कॉल करून सांगितलं होतं की, मी प्रतीक्षाला १३ हजार रुपये तिला (फोन करणाऱ्या बाईला) ऑनलाइन पाठवायला सांगितलं आहे आणि त्या बाईने माझ्या पत्नीच्या फोनवर पहिल्यांदा १० हजार पाठवले. मग ३ हजार एवजी ३० हजार पाठवले आणि त्या दोन्ही व्यावहारांचे स्क्रिनशॉट तिला पाठवले आणि फोन करून सांगितलं की, मी चष्मा घातला नव्हता म्हणून चुकून तुमच्या अकाउंटवर ३ हजारांऐवजी ३० हजार पाठवले आहेत. तुम्हाला त्याचा फोटो पाठवला आहे. तर मी तुम्हाला माझा स्कॅनर पाठवते, तुम्ही मला उरलेले २७ हजार पाठवा.”

गिरीश यांनी पुढे सांगितलं, “माझी पत्नी त्या बाईला म्हणाली, ऑनलाइन हा व्यवहार झालेला दिसत आहे, परंतु माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाही, मग मी काय करू? तेव्हा त्या बाईने माझ्या पत्नीला हे ही विचारलं की काय हो तुमच्या खात्यात किती पैसे आहेत. यावर माझ्या पत्नीने ते मी तुम्हाला का सांगू असं विचारलं आणि असं विचारल्यानंतर त्या बाईने फोन कट केला. याचा अर्थ त्या बाईला माझ्या बायकोची फसवणूक करायची होती आणि मी जेव्हा पुन्हा त्या नंबरवर कॉल केले तेव्हा तो नंबर व्यस्त दाखवत होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही पोलिसांना याबाबत कळवलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, अशा अनेक केसेस सध्या होत आहेत आणि त्यांचे असे अनेक नंबर असतात, त्यामुळे तुम्ही कितीही कॉल केले तरी तुमचा फोन उचलला जाणार नाही.” पुढे अभिनेता म्हणाला, “तुमच्या फोनमध्ये ती रक्कम आल्याचंही तुम्हाला दिसेल, परंतु जर नीट पाहिलं तर त्याखाली एक सूचना लिहिलेली असते, जी नीट वाचणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा सतर्क राहा.”