‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. त्या दोघांनी कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत त्या दोघांनी लगीनगाठ बांधली. या दोघांचे लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. त्यानंतर आता हार्दिक आणि अक्षयाच्या संगीत सोहळ्यातील एक खास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हार्दिक आणि अक्षयाने पुण्यात सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात झाली. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्यापूर्वी संगीत सोहळा पार पडला होता. या संगीत सोहळ्याला अनेक उपस्थित कलाकारांनी डान्स केला. यातील अनेक डान्सचे व्हिडीओ समोर आले आहेत. आता राणादा-पाठकबाई यांच्या संगीत सोहळ्यातील एक खास व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा : Photos: मराठी कलाकारांच्या मंगळसूत्रांच्या हटके स्टाइल, डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

या व्हिडीओत राणादा म्हणजेच हार्दिक जोशी हा अक्षयासाठी चक्क सरप्राईज डान्स करताना दिसत आहे. यावेळी तो शाहरुख खानचा सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘साजन जी घर आए’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. याचा एक व्हिडीओ हार्दिकची बहिण कोमल शेटेने शेअर केला आहे.

हार्दिक जोशीने कोणताही सराव न करता अक्षया देवधरसाठी केलेला सरप्राईज डान्स… #अहा संगीत! असे कॅप्शन तिने दिले आहे. या डान्समध्ये हार्दिक हा हुबेहुब सलमान खान प्रमाणे नाचताना दिसत आहे. त्याचा हा डान्स पाहून अक्षया देवधरही मजा घेताना दिसत आहे. यावेळी ती चक्क हात जोडून त्या डान्सच्या स्टेप्स करताना दिसत आहे.

आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षया आणि हार्दिक घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांच्या राणादा-पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम दिलं होतं. ऑनस्क्रीन चाहत्यांच्या मनात राज्य केलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळेत्यांचे चाहतेही खूश आहेत. अनेकांनी अक्षया-हार्दिकला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.