हार्दिक जोशी व अक्षया देवधर त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघांनीही नाशिकला जात सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर हार्दिकच्या घरीही अक्षयाचं जोरदार स्वागत झालं. लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे? याबाबत आता हार्दिकने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे, समुद्रकिनारी वाळूत लोळली अन्…

हार्दिकने लग्नानंतर पहिल्यांदाच झी टॉकिजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२२’च्या नामांकन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याने पिवळ्या रंगाचं टी-शर्ट व जीन्स परिधान केली होती. यावेळी ‘इट्स मज्जा डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं.

लग्नानंतर आयुष्य किती बदललं आहे? असा प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला. यावेळी हार्दिक म्हणाला, “लग्नानंतर आयुष्य नक्कीच बदललं आहे. माझ्या आईने आता सगळी जबाबदारी सोडली आहे. आधी घरातून बाहेर निघताना आईला फोन करायचो. कोणते कपडे परिधान करू हे विचारायचो. पण आई म्हणते आता मला काहीही विचारायचं नाही.”

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस १६’मधून अब्दू रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना ढसाढसा रडला, व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी नामांकन सोहळ्याला निघताना अक्षया बाहेर होती. तिला मी व्हिडीओ कॉल केला. आईला बाजूला बसवलं. पण आई बोलली आता तिकडेच (अक्षया) विचारायचं. त्यामुळे अक्षयाने जे सांगितले तेच कपडे परिधान करून मी इकडे आलो. माझं स्टायलिंग अक्षयाने केलं आहे.” लग्नानंतरही हार्दिक व अक्षया सुखी आयुष्य जगत आहेत.