‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री हिना खान सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हिनाच्या आजाराबद्दल सगळीकडे अफवा पसरली होती आता यावर शिक्कामोर्तब करत अभिनेत्रीने ही बातमी खरी असल्याची पुष्टी दिली आहे.

हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे. हिना या आजाराशी झुंज देत असून तिने यावरील उपचारांना सुरूवातदेखील केली आहे. हिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत सगळ्यांना कल्पना दिली होती. आता आयुष्यातील हा खडतर टप्पादेखील निघून जाईल असं म्हणत हिनाने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने काढला पायावर ‘गेटवे ऑफ इंडिया’चा टॅटू, फोटो शेअर करत म्हणाली…

हिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कर्करोग झाल्याची माहिती दिल्यानंतर आता चाहत्यांबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. “हा टप्पादेखील निघून जाईल” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने स्माईली आणि हार्टच इमोजी वापरलं आहे. या आजारावर मात करण्याचा दृढनिश्चय दाखवत हिनाने रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटातील ‘कर हर मैदान फतेह’ या गाण्याचा वापर करत ही पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: प्रियाला जीवे मारण्याचा प्रयत्न अन्…, सायली- अर्जुनचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर येईल का? पाहा प्रोमो

शुक्रवारी २८ जून रोजी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर या आजाराबाबत सगळ्यांना माहिती देत पोस्ट शेअर केली आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या अफवांना अभिनेत्रीने पूर्णविराम दिला. हिनाला स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती तिने तिच्या चाहत्यांना दिली. यादरम्यान ती बरी आहे आणि या आजारावत मात करण्यासाठी लागणारे उपचारदेखील तिने सुरू केले आहेत असंही ती म्हणाली. या कठीण काळात तिचे कुटुंबीय खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे आहेत असंही हिनाने नमूद केलं.

हेही वाचा… …अन् जुई गडकरीवर आली पिस्तूल बाळगण्याची वेळ; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “मला जीवे मारण्याची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिनाच्या आजाराबाबत कळल्यानंतर अनेक चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मृणाल ठाकूर, गौहर खान, जेनिफर विंगेट, अमृता खानविलकर, आरती सिंग, अंकिता लोखंडे, सुरभी ज्योति, राघव जुयाल, नेहा पेंडसे, जय भानुशाली, मौनी रॉय अशा अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.