Hina Khan Rocky Jaiswal : अभिनेत्री हिना खानला स्तनांचा कॅन्सर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण तरीही ती जोमाने काम करतेय. कॅन्सरग्रस्त हिनाने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड रॉकी जायस्वालशी लग्न केलं. त्यानंतर ती पती रॉकीबरोबर ‘पती पत्नी और पंगा’ शोमध्ये सहभागी झाली आहे. हिना व रॉकी या शोमध्ये मस्ती करताना दिसतात.
रॉकी व हिना एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हिना बरेचदा रॉकी या गंभीर आजारात तिच्याबरोबर कसा खंबीरपणे उभा आहेत, तिला साथ देतोय, तिची काळजी घेतोय याबद्दल बोलत असते. आता या दोघांबद्दल शोमधून एक अपडेट आली त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.
लग्नानंतर हिना व रॉकी एकाच बेडवर झोपत नाहीत, असं म्हटलं जातंय. दोघांच्या लग्नाला ५ महिने झाले आहेत, अचानक हिना व रॉकीबद्दल अशी बातमी आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या बेडरूम सिक्रेटबद्दल चर्चा नेमकी कुठून सुरू झाली, ते पाहुयात.
सोनाली बेंद्रेने विचारला ‘तो’ प्रश्न
हिना व रॉकी दोघेही सध्या ‘पती पत्नी और पंगा’मध्ये दिसत आहेत. या शोचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये टास्कदरम्यान होस्ट सोनाली बेंद्रे स्पर्धकांना एक प्रश्न विचारते. कोणतं जोडपं बेडवर एकत्र झोपत नाही? असा तो प्रश्न असतो.
सोनालीने हा प्रश्न विचारल्यावर अविका व मिलिंद, स्वरा व फहाद यांनी हिना- रॉकीचं नाव घेतलं. हिना तिचं व रॉकीचं नाव ऐकून हैराण होते. हे चारित्र्य हनन आहे, असं म्हणत रॉकी ही गोष्ट नाकारतो. हे सगळं खोटं आहे, असं ती म्हणते.
हिना खान नंतर ओरडते आणि खेळात हरण्यासाठी पती रॉकीला जबाबदार धरते. सर्वजण गंमत करत असतात, याचदरम्यान वातावरण आणखी रंजक करण्यासाठी हिना तिची जागा सोडून निघून जाते. नंतर ती शो सोडण्याची धमकी देते. दुसरीकडे शोमधील या विनोदाला काही जणांनी सिरियस घेतलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक रॉकी व हिनाच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.