मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे नारकर कपल. ९० दशकापासून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या चिरतरुण कपलच्या अभिनयाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे, तितकाच त्यांचा डान्स व्हिडीओचा देखील चाहता वर्ग तयार झाला आहे. अविनाश व ऐश्वर्या नारकर यांचे डान्स व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. काल, अविनाश नारकरांचा वाढदिवस होता. ऐश्वर्या नारकरांनी आपल्या पतीचा हा खास दिवस कसा साजरा केला? जाणून घ्या… ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकरांच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली होती. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी तुमच्यावर अनंत आणि त्याहीपलीकडे प्रेम करते. तुमच्यावर कायम आशीर्वाद असो,” असं लिहित ऐश्वर्या यांनी अविनाश नारकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टमध्ये ऐश्वर्या नारकर अविनाश यांना केक भरवताना पाहायला मिळाल्या. हेही वाचा - ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरला आईने नव्हे तर सासऱ्यांनी शिकवला स्वयंपाक, म्हणाली… या खास पोस्टनंतर आज ऐश्वर्या नारकरांनी एक व्हिडीओ शेअर करून पुन्हा एकदा अविनाश नारकरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत, ऐश्वर्या अविनाश यांचं औक्षण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे, "औक्षवंत हो…कायम आनंदी रहा…तू खूप खूप महत्वाचा आहेस माझ्यासाठी…सगळ्यांसाठी…" ऐश्वर्या नारकरांच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरे थिरकले शाहरुख-काजोलच्या गाण्यावर; व्हिडीओ पाहिलात का? अभिनेत्री अक्षया नाईक, अश्विनी कासार, सुरुची अडारकर, भक्ती रत्नपारखी, तितीक्षा तावडे, अमृता बने अशा बऱ्याच कलाकारांनी ऐश्वर्या व अविनाश यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच चाहत्यांनी अविनाश नारकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा – Video: धर्मासाठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने वर्षभरानंतर लेकाची दाखवली पहिली झलक, पाहा गोंडस तारिक जमीलचा व्हिडीओ दरम्यान, अविनाश व ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश यांचा 'डंका हरी नामाचा' चित्रपट १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अविनाश नारकरांसह अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव झळकणार आहे. या चित्रपटातील गाणी सध्या चांगली चर्चेत आहेत. तसंच ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.