मृणाल कुलकर्णी यांची सून शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आज तिचा वाढदिवस. यानिमित्त अभिनेता ऋषिकेश शेलार याने तिच्यासाठी खास पोस्ट लिहित खऱ्या आयुष्यात तिच्या स्वभाव कसा आहे याचा खुलासा केला आहे.

शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे तर ऋषिकेश शेलार या मालिकेत ‘अधिपती’ या प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील शिवानीच्या कामाचं खूप कौतुक होतं. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील तिचे चाहते उत्सुक असतात. आता ऋषिकेशने शिवानीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत तिचा खरा स्वभाव प्रेक्षकांसमोर आणला आहे.

What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…

आणखी वाचा : सून शिवानी रांगोळेच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णींची खास पोस्ट, मनातली इच्छा व्यक्त करत म्हणाल्या, “लवकर…”

आज ऋषिकेशने त्याचा आणि शिवानीचा एक खास बिहाईंड द सीन फोटो शेअर केला. हा त्यांचा सेल्फी शेअर करत त्याने लिहिलं, “हॅपी बर्थडे द वन अँड ओन्ली मास्तरीन बाई. खूप छान व्यक्ती आणि सहकलाकार… माणूस म्हणून अत्यंत नम्र आणि खरी. तू आहेस तशीच राहा. आपलं हे बॉण्डिंग असंच कायम राहू देत ही इच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझं पुढील वर्ष यशस्वी जावो.”

हेही वाचा : शिवानी रांगोळेने सांगितला कविता मेढेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “एकत्र सीन करताना…”

ऋषिकेशने शेअर केलेली ही पोस्ट आता सर्वांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टवर कमेंट करत शिवानीचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याबरोबरच शिवानी आणि ऋषिकेश यांच्यामधील असलेल्या केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत.

Story img Loader