यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार गर्दी करताना दिसत आहेत. नुकतंच एक मराठमोळी अभिनेत्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली आहे.

विविध मालिकांमधून तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणून अदिती द्रविडला ओळखले जाते. अदिती ही ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत झळकली. यात तिने नंदिनी हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील एका गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

नुकतंच अदितीने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती टीम इंडियाची जर्सी घालून सामना पाहायला जात असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने “इंडिया, इंडिया” असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
aditi dravid 1
अदिती द्रविड

आणखी वाचा : “झेड सिक्युरिटी, सगळीकडे शांतता…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ अनुभव, म्हणाली “अचानक बच्चन सर थांबले अन्…”

दरम्यान भारत-पाकिस्तान सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा सामना पाहण्यासाठी राजकीय नेते, सिनेसृष्टीतील मंडळींपासून अनेक क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत. यावेळी अरिजित सिंहसोबत शंकर महादेवन, सुनिधी चौहान, नेहा कक्कर आणि पंजाबी गायक सुखविंदर सिंग या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत.