‘इंडियन आयडल’ फेम गायक पवनदीप राजनचा काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश येथे भयानक अपघात झाला होता. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. आता पवनदीपच्या तब्येतीत सुधारणा असून हॉस्पिटलमधून त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील समोर येत आहेत.

पवनदीप राजन आता सोशल मीडियावरही सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो कर्मचाऱ्यांबरोबर बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. त्याने लिहिले, ‘रिकव्हरी मोड चालू आहे. तुमच्या आशीर्वादांबद्दल धन्यवाद’.

पवनदीपचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो या अवस्थेतही गाणं गात आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, आता पवनदीप राजनच्या चाहत्यांना खात्री पटली आहे की तो बरा होत आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये, पवनदीप हॉस्पिटलच्या बेडवर बसून एक गाणे गात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पवनदीप राजन बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या ‘शंघाई’ या चित्रपटातील ‘जो भेजी थी दुआ’ हे सुपरहिट गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘तुम्हाला असे पाहून मला खूप आनंद झाला.’ तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, ‘लवकर बरे व्हा.’

५ मे रोजी घडली दुर्घटना

मीडिया रिपोर्टनुसार, पवनदीपच्या गाडीचा अपघात मध्य प्रदेश येथे झाला आहे. यामध्ये पवनदीपच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने पवनदीप यातून बचावला. परंतु त्याच्या दोन्ही हाताला गंभीर जखम झाली आहे. या दुर्घटनेत पवनदीप आणि त्याचे २ मित्रही जखमी झाले. पवनदीपवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

View this post on Instagram

A post shared by Shekhar Roy (@necropolis_028)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवनदीप मूळचा उत्तराखंडचा आहे. त्याच्या चांगल्या आवाजामुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. ‘इंडियन आयडल १२’ चा तो विजेता आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही पवनदीप राजनच्या म्यूझिक कॉन्सर्टला त्याचे चाहते हजेरी लावत असतात. सध्या तो मोठ्या अपघातातून सावरत आहे. यादरम्यान त्याचे आगामी कॉन्सर्ट्स रद्द झाले आहेत.