बिग बॉस (Bigg Boss)च्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. या खेळात अनेकदा काही स्पर्धकांमध्ये शत्रुत्व निर्माण होते; तर काही स्पर्धकांच्या मैत्रीची चर्चा रंगलेली दिसते. बिग बॉसच्या घरात या स्पर्धकांमध्ये जसे नाते असते, ते नाते तसेच कायम राहणार का, याबद्दलदेखील प्रेक्षकांना उत्सुकता असते.

‘बिग बॉस’नंतर सूरजमध्ये काय बदल झाला?

आता ‘बिग बॉस मराठी ५’वे पर्व काही दिवसांपूर्वी संपले आहे. मात्र, या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक या शोनंतरही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आणि सूरज चव्हाण (Suaraj Chavan) हे बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या गटांतून खेळत होते. मात्र, शोबाहेर त्यांनी आपले बहीण-भावाचे नाते जपले आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी सूरज चव्हाणच्या घरी गेली होती. त्यानंतर नुकतीच ती भाऊबीजेलादेखील सूरजकडे गेल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. आता जान्हवीने एका मुलाखतीत बिग बॉसनंतर सूरजमध्ये कोणता बदल झाला आहे का? यावर वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, सोशल मीडियावर सध्या तू बारामतीला सूरजला भेटण्यासाठी गेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरातील सूरज आणि आताचा सूरज, या दोहोंमध्ये किती बदल झाला आहे? यावर उत्तर देताना जान्हवी किल्लेकरने म्हटले, “मला सूरज आता जास्त प्रेमळ वाटायला लागला आहे. बिग बॉसच्या घरात तो त्याचा गेम असेल किंवा काहीही असेल, ते ठीक आहे. तो गेम तसा फारसा खेळलाच नाही. तो जसा बाहेर होता, तसाच आतमध्ये वागला आहे. पण, आता तिथे त्याच्या गावी गेल्यावर त्याला असं झालेलं की, जान्हवी आली आहे, तिला कुठं ठेवू, तिला छान वाटेल, असं तिच्यासाठी काय करू. तो सतत माझा हात पकडूनच होता आणि मीही त्याचा हात पकडूनच होते. मी फार उशिरा गेले होते, रात्री ११ वाजता आम्ही त्याच्या शाळेत गेलो. ‘इथे मी मोठा झालो, इथे मी खेळायचो’, असे सांगणाऱ्या सूरजला ते दाखवायचं होतं. त्याने मला मरीआईच्या देवळात नेलं. आम्हाला भेटण्याचा त्याचा जो उत्साह होता, तो कमाल होता. मजा आली. तो काहीच बदललेला नाही; उलट अजून प्रेमळ झाला आहे”, असे म्हणत जान्हवीने सूरजचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: मृणाल कुलकर्णी झळकणार ‘पैठणी’ चित्रपटात! सोबतीला असेल Bigg Boss 18 मधली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जान्हवीने बारामतीत जाऊन सूरजची भेट घेतली होती. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्या दोघांचेही नेटकऱ्यांकडून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.