‘कैसी ये यारियां’ या शोमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नीती टेलर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आजवर अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नीतीच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या असल्याच्या बातम्या येत आहेत. चार वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकणारी नीती आता पतीपासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व अफवा नीतीने सोशल मीडियावर केलेल्या काही कृतींमुळे होत आहेत.

नीती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नीती टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पण आता नीतीच्या वैयक्तिक आयुष्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. २०२० मध्ये लष्करी अधिकारी परिक्षीत बावा याच्याशी प्रेम विवाह करणारी नीती घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नीतीने सोशल मीडियावर काही पोस्ट डिलीट केल्या आहेत, तसंच तिने इन्स्टाग्रामवरचं तिचं नाव बदललं आहे, यानंतर तिच्या वैवाहिक आयुष्यात सगळं ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

नीती टेलरने हटवलं आडनाव

अभिनेत्री नीती टेलरने इन्स्टाग्राम अकाउंटवरील नावात पतीचं आडनाव लावलं होतं. पण आता तिने अचानक बावा हे आडनाव हटवलं आहे. इतकंच नाही तर तिने पती परीक्षित बावा याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. नीतीने अनफॉलो केल्यावर परीक्षितने त्याचं अकाउंट डिलीट केलं होतं पण काही काळानंतर त्याचं अकाउंट पुन्हा दिसत आहे. नीतीने पतीला अनफॉलो केलं व आडनाव हटवल्यानंतर या जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होत आहे. नीती व परीक्षित यांचं लव्ह मॅरेज होतं, पण आता या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

नीतीने डिलीट केले पती अन् सासरच्या लोकांचे फोटो

नीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनेक फोटो आणि व्हिडीओ हटवले आहेत. तिने डिलीट केलेले फोटो व व्हिडीओ प्रामुख्याने ते आहेत, ज्यात तिचा पती आणि सासरचे लोक दिसत होते. तिने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओदेखील डिलीट केले आहेत. नीतीच्या या कृतीनंतर तिच्या वैवाहिक जीवनात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होत आहेत.

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीती टेलर व परीक्षित बावा दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर चार वर्षांपूर्वी २०२४ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. आता नीतीने सोशल मीडियावरचे फोटो डिलीट केल्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे, पण अद्याप नीती किंवा परीक्षितने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.