Zee Marathi Kamali Serial : ‘कमळी’ मालिकेत सध्या दिवाळीचा सीक्वेन्स सुरू आहे. महाजनांच्या घरासमोर किल्ला तयार करावा अशी अन्नपूर्णा आजीची इच्छा असते. आजीच्या इच्छेनुसार कमळी सुंदर किल्ला बनवते. ही गोष्ट अनिकाला अजिबात आवडत नाही. ‘कमळीमध्ये असं काय आहे? जे माझ्यात नाहीये’ असा विचार अनिकाच्या मनात येतो. यामुळेच मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.
कमळीला कायमचं जेलमध्ये टाकायचं आणि कॉलजेची GS व्हायचं असा अनिकाचा प्लॅन असतो. मात्र, कमळी मोठ्या हुशारीने या संकटातून बाहेर पडते. खरंतर, पोलीस अनिकाला अटक करण्यासाठी आलेले असतात मात्र, कमळीने केस मागे घेतल्यामुळे तिची सुटका होते. कमळीने एवढी मदत करूनही अनिकाला कोणत्याच गोष्टीची जाणीव नसते. आपण गावछाप कमळीला काही करून त्रास द्यायचा हे एकमेव ध्येय तिच्यासमोर असतं.
पण, यावेळी अनिका कमळीला मात देण्यासाठी एक वेगळा डाव रचणार आहे. कमळीला सगळेजण जीव लावतात, तिची कायम बाजू का घेतात असे प्रश्न अनिकाच्या मनात निर्माण होतात आणि यामुळे सर्वप्रथम ती स्वत:चा लूक बदलण्याचा निर्णय घेते.
नेहमी वनपीस, वेस्टर्न ड्रेसवर फिरणारी अनिका कॉलेजमध्ये पहिल्यांदाच ड्रेस घालून देसी अंदाजात एन्ट्री घेणार आहे. अनिकाला या रुपात यापूर्वी कोणीही पाहिलेलं नसतं. त्यामुळे तिला पाहताच सर्वांना धक्का बसतो. काही विद्यार्थी तिचे फोटो-व्हिडीओ काढू लागतात. अनिकाने स्वत:चा लूक अचानक का बदलला? याबद्दल चर्चा सुरू होते.
अनिकाला पाहण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये गर्दी झालेली असते. इतक्यात हृषी तिथे पोहोचतो आणि म्हणतो, “हा काय नॉनसेन्सपणा आहे, आता तू कोणता नवीन स्टंट सुरू केलायस?” हृषीचं बोलणं ऐकून अनिका डोळे पाणावल्याचं नाटक करते.
आता या नव्या अंदाजात कॉलेजमध्ये एन्ट्री घेतल्यावर अनिकाचा पुढचा प्लॅन काय असेल? ती हृषीला या नव्या मेकओव्हरबद्दल काय सांगणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘कमळी’ मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाते. आता अनिका खरंच सुधारलीये की ती फक्त संस्कारी असल्याचं नाटक करतेय हे आगामी भागात स्पष्ट होईल.
