अभिनेता सैफ अली खान, हृतिक रोशन यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नुकतेच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा ही आकडेवारी कमी आहे. २०१७ साली आलेल्या दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. हृतिक रोशनने साकारलेल्या वेधा या भूमिकेचं कौतुक होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. नुकतेच या चित्रपटातील कलाकार कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशनसाठी गेले होते. या कार्यक्रमात कपिल शर्माने प्रामुख्याने सैफ अली खान राधिका आपटे या दोघांची खिल्ली उडवली आहे.

नुकतेच या चित्रपटातील कलाकार कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशनसाठी गेले होते. या कार्यक्रमात कपिल शर्माने प्रामुख्याने सैफ अली खान राधिका आपटे या दोघांची खिल्ली उडवली आहे.या कार्यक्रमात सैफ अली खानला अनेक मजेदार प्रश्न कपिल शर्माने विचारले होते. कपिलने सैफला विचारले, ‘तुझे या आधीचे चित्रपट बघितले ज्यात तू काही ना काही पकडतो आहेस. भूत पोलीस चित्रपटात तू भूतांना पकडतो आहेस, बंटी बबली चित्रपटात खोट्या बंटी बबलीला पकडत होता. चित्रपटांमध्ये आम्ही पहिले मात्र खऱ्या आयुष्यात जेव्हा तू तुझ्या फार्महाउसवर जातोस तिथे कोंबडी पकडण्यासाठी कोण ठेवले आहे’? सैफने लगेच उत्तर दिले ‘मी एक कोंबडा ठेवला आहे’. कपिलने लगेच विचारले, ‘या चित्रपटातदेखील कधी त्या बंदूक पकडून आहेस कधी राधिकाला पकडून आहेस’, त्यावर सैफने उत्तर दिले की, ‘होय या चित्रपटात एक सीन आहे जिथे मी एका हातात बंदूक पकडली आहे तर दुसऱ्या हातात राधिकाला पकडले आहे. सैफच्या या उत्तरावर प्रेक्षक खुश झाले’.

बॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक! सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत?

या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.५० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे समीक्षणदेखील चांगले आहे, प्रेक्षक जे चित्रपट पाहून येत आहेत त्यांनीदेखील चित्रपटाचे कौतुक केले आहे.‘विक्रम वेधा’’ भारतात ४००० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे हा एक मोठा चित्रपट म्हणता येईल. सैफ एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.