अभिनेता करण कुंद्रा व अभिनेत्री तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमसंबंध जुळल्यानंतर करण व तेजस्वी आता रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकतंच त्यांनी दुबईत घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियाद्वारे ही माहिती त्यांनी चाहत्यांनी दिली आहे.

करण व तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांचा चाहता वर्गही फार मोठा आहे. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील अनेक अपडेट ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असतात. गोव्यात घर खरेदी केल्यानंतर आता तेजस्वी करणसह दुबईतील आलिशान घराची मालकीण झाली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत दुबईतील त्यांच्या घराची झलक दाखविली आहे.

हेही वाचा>> मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी पार पडला शाही विवाहसोहळा, मेहंदीचे फोटो व्हायरल

हेही वाचा>> हिरवा चुडा, मंगळसूत्र अन् टिकली; अक्षयाच्या “मिसेस जोशी” फोटोने वेधलं लक्ष

तेजस्वी व करणच्या दुबईतील घरात प्रशस्त हॉल आहे. त्यांच्या घरात डेकोरेटिव्ह इंटेरिअरही केल्याचं दिसत आहे. लक्झरिअस बेडरुम व किचनमध्ये मार्बल स्टोनने फर्निचर केलं आहे. करण-तेजस्वीच्या या घराच्या बाल्कनीत स्विमिंगपूलही आहे. तेजस्वीने शेअर केलेल्या या दुबईतील आलिशान घराच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>>समीर चौगुलेंना चाहत्याने बनवलं स्पायडरमॅन; अभिनेता पोस्टवर कमेंट करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करण व तेजस्विनी मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या १५व्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. नुकतंच तेजस्विनीने ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटात ती अभिनय बेर्डेसह मुख्य भूमिकेत होती.