अभिनेता करण कुंद्रा व ‘नागिन’ फेम अभिनेत्री तेजस्वी कुंद्रा रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात. ‘बिग बॉस १५’ या शोमध्ये त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली होती. दोघांनीही जाहीरपणे नात्याची कबुली दिली आणि आता ते अनेक ठिकाणी एकत्र दिसतात, एकमेकांच्या कुटुंबीयांबरोबरही ते फिरताना दिसतात. दरम्यान, करण आणि तेजस्वी लग्न कधी करणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. अशातच करणच्या आईने दोघांच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच अभिनेता करण कुंद्रा त्याच्या कुटुंबाबरोबर डिनर करताना दिसला. यावेळी त्याच्यासह त्याचे आई-वडील होते. त्या सर्वांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. शिवाय करण आणि त्याच्या आईने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कॅमेरामनने करणच्या आईला मुलाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. करण आणि तेजस्वीचे लग्न कधी होणार, असे विचारताच त्याच्या आईने उत्तर दिलं की, दोघांचं लग्न लवकरच होणार आहे. त्यानंतर त्यांना लग्नाची तारीख विचारली, पण अद्याप लग्नाची तारीख ठरली नसल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे, करणच्या वडिलांना मुलाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा – कुणी इस्लाम तर कुणी कृष्णाच्या भक्तीसाठी अभिनय क्षेत्र सोडलं; काहींनी तर नाव बदलत केला आध्यात्माचा स्वीकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करण आणि तेजस्वी दोघेही बिग बॉसच्या १५व्या पर्वात स्पर्धक होते. याच शोमध्ये ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. तेजस्वी या शोची विजेती ठरली होती. करण आणि तेजस्वीचं प्रेम फक्त या शोपुरतंच असेल, असं अनेकांना वाटत होतं, परंतु बिग बॉसचा घरातून बाहेर पडून बराच काळ झाल्यानंतरही ते दोघे एकत्र आहेत. ते लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जातंय.