सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो घराघरात लोकप्रिय आहे. यातील प्रत्येक भाग हा फारच रंजक असतो. या कार्यक्रमात साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला लाखो रुपये कमवता येतात. नुकंतच केबीसीच्या भागात मिर्झा इशाक नावाचे स्पर्धक हॉट सीटवर पाहायला मिळाले. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांना ५० लाख रुपयांसाठी प्रश्न विचारला. मात्र त्यांना याचे उत्तर देता आले नाही. यामुळे बिग बीसुद्धा चकित झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

या शोमधील स्पर्धक पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिर्झा इशाकने अगदी सहजरित्या दिले. यामुळे त्याने १० हजार रुपये जिंकले. यानंतर बिग बींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यातील काही माहिती असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. तर काही ठिकाणी त्याने लाइफलाईनचा वापर केला.
आणखी वाचा : ‘कौन बनेगा करोडपती’चे प्रश्न कोण तयार करतात? उत्तरं आलं समोर

यावेळी कार्यक्रमादरम्यान साडे बारा लाखांच्या प्रश्नावर त्यांनी शेवटची लाईफलाईन वापरली. यानंतर त्यांना २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र ५० लाखांच्या प्रश्नावर त्यांना योग्य उत्तर ठाऊक नसल्याने त्यांना खेळ सोडावा लागला. यावेळी त्यांच्या लाईफलाईनही संपल्या होत्या. यावेळी मिर्झा इशाक यांना २५ लाख रुपये घेऊन घरी परतावे लागले.

प्र.१. यापैकी कशावर आपण सहसा पडद्यांचा वापर करतो?
A. भिंत
B. खिडकी
C. छप्पर
D. फरशी

योग्य उत्तर – खिडकी

प्र. खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारचे क्षेत्र मोठे असते?
A. क्रिकेट
B. बॉक्सिंग
C. कबड्डी
D. बुद्धीबळ
योग्य उत्तरः क्रिकेट

यानंतर बिग बींनी त्यांना एक गाणे ऐकवली. त्यानंतर त्यांनी याबद्दल प्रश्न विचारला.

प्र ३. हे गाणे कोणत्या उत्सवादरम्यान वाजवले जाते?
A. दिवाळी
B. होळी
C. रक्षाबंधन
D. ख्रिसमस
योग्य उत्तर: होळी

यानंतर बिग बींनी ५० लाखांसाठी त्यांना प्रश्न विचारला. ज्यावर उत्तर न देता आल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला.

प्र ५. संविधानाच्या कलम १ मध्ये आपल्या देशाचे नाव कसे लिहिले आहे?
A. भारतीय प्रजासत्ताक (Republic of India)
B. भारत म्हणजे भारत (India, that is Bharat)
C. भारत एक अधिराज्य (भारतीय अधिराज्य) – (Bharat, a dominion)
D. युनियन ऑफ इंडिया (Union of India)

आणखी वाचा : ‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी बिग बी घेतात इतकं मानधन? कपड्यांवरही होतो लाखोंचा खर्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रश्नाचे योग्य उत्तर भारत म्हणजे भारत (India, that is Bharat) असे आहे. बिग बींनी ५० लाख रुपयांसाठी हा प्रश्न विचारला होता. मात्र या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्याने त्या ट्रेलरने अर्ध्यावर हा खेळ सोडला.