‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने या देशाच्या महानायकाला एक वेगळीच ओळख दिली आणि आजतागायत ती ओळख आणि सामान्य प्रेक्षकांचं अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम कायम आहे. आज प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने टेलिव्हिजनच्या विश्वात वेगळेच विक्रम रचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमाच्या १४ व्या सीझनच्या आगामी एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी शूटिंगनंतर सेटवर काय काम असतं याबाबत खुलासा केला आहे. शूटिंग पूर्ण झालं की सेटवर असलेल्या प्रेक्षकांबरोबर अमिताभ बच्चन कसा वेळ घालवतात याविषयी त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. शूटिंगनंतर प्रत्येक चाहत्यासाठी बच्चन जमेल तसा वेळ काढतात. नव्या एपिसोडमध्ये ही सगळी गंमत एका स्पर्धकाशी अमिताभ यांनी शेअर केली.

आणखी वाचा : ‘Indian Idol 13’च्या सेटवरील भेदभावासंदर्भात ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली “माझी तक्रार…”

सोनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याचा टीझर नुकताचा शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बच्चन म्हणाले, “हा खेळ जसा संपतो, तो संपल्यावर मी सगळ्यांबरोबर फोटो काढतो. कारण हे प्रेक्षक पुन्हा इथे यावेत ही जबाबदारी आमची असते. ही मंडळी म्हणजे आमचे ग्राहक आहेत. त्यांच्याशिवाय आमचं दुकान चालणार नाही. शिवाय हे सगळेजण येताना काहीतरी भेटवस्तू घेऊन येतात. जेव्हा मी आत खोलीत जातो तेव्हा ढीगभर कागदावर स्वाक्षरी द्यावी लागते. तब्बल १ ते २ तास सही करण्यातच जातात, नाहीतर त्यांना वाईट वाटतं. जे लोक पुन्हा येतात ते आधी आणलेली भेटवस्तू वापरली की नाही याबद्दल विचारणा करतात.”

केबीसीचं शूटिंग संपल्यावर ही अशी काही कामं आहेत जी बच्चन यांना नियमितपणे कारावीच लागतात. याबरोबरच नवीन भागात एका स्पर्धकाला मुख्य जागेवर बसून खुद्द बिग बि हॉटसीटवर बसले आहेत ही झलकही आपल्याला या टीझरमध्ये पाहायला मिळते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun banega crorepati season 14 amitabh bachchan need to these chores after shoot avn
First published on: 20-11-2022 at 18:43 IST