ज्या कार्यक्रमाने अमिताभ बच्चन यांना नवी ओळख निर्माण करून दिली तो कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. अमिताभ बच्चन हे गेली कित्येक वर्षं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत कित्येक सामान्यांची असामान्य स्वप्नं पूर्ण करण्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा खूप मोठा सहभाग आहे. या कार्यक्रमात स्पर्धकांना सामान्य ज्ञान, राजकारण, देश विदेश, कला या क्षेत्राशी निगडित प्रश्न विचारले जातात. अलिकडेच केबीसीच्या भागात अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला कियारा अडवाणीशी संबंधित प्रश्न विचारला. ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शुक्रवारी, १४ ऑक्टोबर रोजी डॉ. तन्वी खन्ना केबीसीच्या हॉट सीटवर दिसल्या होत्या, खेळा दरम्यान अमिताभ बच्चन यांनी तन्वीला १,६० लाखांच्या प्रश्नासाठी अभिनेत्री कियारा अडवाणीशी संबंधित प्रश्न विचारला. प्रश्न होता, यापैकी कोणत्याअभिनेत्रीचे पहिले नाव आलिया होते, पण नंतर तिने स्क्रीनवर येताच नाव बदलले?. या प्रश्नाच्या उत्तरात अ) क्रिती सॅनन, ब) कियारा अडवाणी, क) परिणिती चोप्रा आणि ड) अनन्या पांडे असे पर्याय देण्यात आले होते. याचे उत्तर होते ‘कियारा अडवाणी’ , स्पर्धकाने योग्य उत्तर दिले आणि १.६० लाखांचा धनादेश त्यांना मिळाला आहे.

पार्टीला जाताना एकता कपूर कपड्यावरून झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले,”ख्रिसमस… “

कियाराने कपिल शर्माच्या शोमध्ये खुलासा केला होता की तिचे पहिले नाव आलिया होते पण इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिने तिचे नाव बदलले होते. कारण आलिया भट्ट आधीच बॉलिवूडमध्ये होती आणि तिने नाव कमावले होते. अशा परिस्थितीत लोकांनी गोंधळात पडू नये असे कियाराला वाटत होते. त्यामुळे तिने आपले नाव बदलून कियारा ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कियाराने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या चित्रपटांमुळे, तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिचा ‘जुग जुग जियो’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. कियारा अडवाणी सध्या आपल्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटात व्यस्त आहे. मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपट तिच्याबरोबर कार्तिक आर्यन झळकणार आहे.