बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. त्यांच्या करिअरबरोबरच अनेकदा त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं होतं. नुकत्याच झालेल्या केबीसीच्या भागामध्ये त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

केबीसीच्या भागाला सुरवात झाल्यावर काशवी शर्मा ही स्पर्धक हॉट सीटवर बसल्यावर बच्चन यांनी तिच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. तेव्हा तिने सांगितले की, “मला माझ्या उंचीवरून प्रॉब्लम होता, त्यावर अमिताभ बच्चन यांनी आपली खंत व्यक्त केली. त्यांच्या उंचीमुळे त्यांना अनेकदा त्रास झाला होता. शालेय जीवनात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ते असं म्हणाले, आमच्या शाळेत बॉक्सिंग हे बंधनकारक होते. माझ्या उंचीमुळे मला मोठ्या वर्गातील मुलांबरोबर टाकायचे, शाळेत मला खूप मर खावा लागला होता कारण माझी उंची जास्त होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उंचीमुळे अमिताभ बच्चन यांना शालेय जीवनातच नव्हते तर बॉलिवूडमध्येदेखील त्रास सहन करावा लागला होता. सुरवातीला त्यांना त्यांच्या उंचीमुळे चित्रपटात कोणी घेत नव्हते. कारण त्याकाळात देखणे अभिनेत्यांची क्रेझ होती. मात्र त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर या सगळ्या गोष्टींवर ,आत करत बॉलिवूडचे शहेनशहा बनले.