‘कौन बनेगा करोडपती’ सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय क्वीज शो आहे. पण यात लहान मुलांना सहभागी होता येत नाही. पण आता लवकरच लहान मुलांनाही या शोमध्ये सहभागी होता येणार आहे. लवकरच ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर्स’ सुरू होणार आहे. ज्यात देशभरातील मुलांना सहभागी होता येणार आहे. निर्मात्यांनी ‘केबीसी ज्युनियर्स’ची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये कसं सहभागी होता येणार याबाबत एका व्हिडीओमधून माहिती दिली आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांनी या शोमध्ये कसं सहभागी होता येईल याबाबत सांगितलं आहे. तो म्हणतात, “जसं आम्ही सांगितलं होतं की आपल्या देशातील ज्युनियर्सनाही या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सोनी लीव अॅप अपडेट किंवा डाऊनलोड करा. केबीसी ज्युनियर्ससाठी तुमचं नाव रजिस्टर करा आणि रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन हॉट सीटवर या.”

हा आहे आजचा प्रश्न
हायड्रोजन व्यतिरिक्त कोणतं मुलद्रव्य पाण्याची रासायनिक संरचना सांगतं?
पर्याय- अ) ऑक्सिजन ब) नायट्रोजन क) कार्बन ड) कॉपर

या प्रश्नाचं उत्तर १३ ऑक्टोबर रात्री ९ वाजेपर्यंत पाठवायचं आहे. अचूक उत्तर देणाऱ्यांना ‘केबीसी ज्युनियर्स’मध्ये येण्याची संधी मिळणार आहे. हे रजिस्ट्रेशन १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

आणखी वाचा- KBC 14 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचं स्पर्धकाने दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहितीये का?

असं करा केबीसी ज्युनियर्सचं रजिस्ट्रेशन

  • सर्वात आधी सोनी लीव अॅप तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करा किंवा अपडेट करा.
  • मोबाइल स्क्रीनवर KBC टॅब चेक करा आणि त्यावर क्लिक करा.
  • स्क्रोल करा आणि केबीसी ज्युनियर रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या मुलाचं नाव, वय, शहर आणि राज्याचं नाव भरा. हे सर्व डिटेल्स व्यवस्थित भरा.
  • स्क्रीवर एक जीके प्रश्न येईल त्याचं अचूक उत्तर द्या. उत्तर दिल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
  • या राउंडमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर केबीसी टीम १५ दिवसांत तुमच्याशी संपर्क करेल.

केबीसी ज्युनियर्ससाठी महत्त्वाचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केबीसी ज्युनियर्समध्ये सहभागी होण्याआधी हे जाणून घ्या की यात सहभागी होण्यासाठी ते मुल भारताचं नागरिक असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आधारकार्ड, रहीवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र ही कागदपत्र असणं गरजेचं आहे. तसेच सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचं वय ८ ते १६ वर्षे असणं गरजेचं आहे.