‘झी मराठी’ वाहिनीची ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका चांगलीच गाजली होती. लोकप्रिय रोमँटिक मराठी मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातं. या मालिकेत अभिनेता ओमप्रकाश शिंदे आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ओमप्रकाशने विक्रांत तर मयुरी मानसीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. दोघांची जोडी सुपरहिट झाली होती.

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेत ओमप्रकाश, मयुरी व्यतिरिक्त अभिनेत्री अभिज्ञा भावे, उषा नाडकर्णी, शर्वाणी पिल्लई, लोकेश गुप्ते, संजय मोने, सविता प्रभुणे, आशा शेलार, संकर्षण कऱ्हाडे, निरंजन नामजोशी, सुनील गोडबोले, अशी तगडी कलाकार मंडळी झळकली होती. सध्या ही कलाकार मंडळी नवनव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. आता ‘खुलता कळी खुलेना’ मधील मानसी म्हणजेच मयुरी देशमुख मराठी मालिकाविश्वात सहा वर्षांनंतर जबरदस्त कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत मयुरीची लवकरच एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा – Video: लाकडी दरवाजा, आकर्षक नेमप्लेट अन्…; अक्षय केळकरने नव्या घराची दाखवली पहिली झलक, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री मुयरी देशमुख ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेनंतर हिंदी मालिका आणि काही चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. अलीकडेच तिचा ‘लग्नकल्लोळ’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मयुरी अभिनेता सिद्धार्थ जाधव व भूषण प्रधानसह झळकली होती. त्यानंतर आता ती मराठी मालिकाविश्वाशात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये मयुरी देशमुख झळकणार आहे. या मालिकेत मयुरी सुखदाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुखदाच्या येण्याने सार्थक आणि आनंदीच्या नात्यात काय बदल होणार? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे. पण बऱ्याच वर्षांनंतर मयुरीला मराठी मालिकेत पाहणं हे चाहत्यांसाठी पर्वणीचं असणार आहे.

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

हेही वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी लग्नानंतर घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दर आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ही मालिका टॉप-१०मध्ये असते.