‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक होते. तर नुकतंच त्या दोघांनी त्यांचं शिक्षण किती हे सर्वांना सांगितलं.
गेली साडेतीन ते चार वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मुग्धा आणि प्रथमेशने त्यांचं नातं सर्वांसमोर आणल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रथमेश व मुग्धाने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास प्रश्न उत्तरांचं सेशन आयोजित केलं होतं. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी दोघांनी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी सांगितली.
प्रथमेशने मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्याने पुण्याच्या भारती विद्यापीठातून एमए इन म्युझिक पूर्ण केलं आहे. तर दुसरीकडे, मुग्धाने रुपारेल कॉलेजमधून बीएससी इन स्टॅटिस्टीक्स केलं आणि त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून एमए इन म्युझिक ही पदवी मिळवली. गेल्याच महिन्यात मुग्धाच्या या मास्टर्स डिग्रीचा निकाल लागला आणि त्यात तिला सुवर्णपदकही मिळालं.
हेही वाचा : प्रथमेश लघाटेने कमी केलं १४ किलो वजन, सिक्रेट शेअर करत म्हणाला, “मी रोज…”
या दोघांचं शिक्षण काय हे कळल्यावर आता सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. तर आता त्यांच्या चाहत्यांचं लक्ष त्यांच्या लग्नाकडे लागलं आहे. हे दोघं पुढच्या 6-8 महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.