अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या ‘बिग बॉस 19’ मध्ये आहे. तिचे घरातील इतर स्पर्धकांशी वाद होत आहेत. तसेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलत आहे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी कुनिकाने एक मुलाखत दिली होती, या मुलाखतीत तिने कुमार सानूबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. विवाहित असूनही ते आपल्याबरोबर नात्यात होते आणि तरीही त्यांनी फसवणूक केली होती, असं कुनिका म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावर कुमार सानूची पहिली पत्नी रीता भट्टाचार्यने प्रतिक्रिया दिली आहे.

विरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत रीताने कुनिका व कुमार सानू यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. “मी कुमार सानूची बाजू घेत नाही, तसेच मी कुनिकाचा विरोधही करत नाहीये.” तुम्ही कुमार सानूशी लग्न केल्यावर कुनिका त्यांच्या आयुष्यात आली व गेली, याबद्दल तुम्हाला माहित आहे का? असं रीताला विचारण्यात आलं. यावर रीता कुनिकाचं नाव न घेता “ती आता तर बोलतेय ना” असं म्हणाली.

कुनिकाचं कुमार सानूबरोबर अफेअर होतं, तेव्हा…

कुनिकाने बिग बॉसच्या घरात जे म्हटलं होतं, त्याबद्दल रीता म्हणाली, “जिने सानू जी बद्दल म्हटलं की तो माझ्याबरोबर असूनही दुसरीबरोबर अफेअर करत होता. तिच्याबरोबरही तर कुमार सानू तेच करत होते. सानू जी तिच्याबरोबर राहत होतो, त्यावेळी त्यांचं लग्न माझ्याशी झालं होतं, ते विवाहित होते. मी गरोदर होते. तेव्हा त्यांचंही तिच्याबरोबर (कुनिका) अफेअरच होतं ना. मग तिच्याबरोबर असताना अफेअर केलं यात नवीन काय आहे?”

कुनिकाने नीलम व तान्याला सांगितलं होतं की कोणातरी बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, तो पुरुष विवाहित होता. त्याच्या लग्नात अडचणी होत्या आणि तो त्याच्या पत्नीबरोबर राहत नव्हता. कुनिकाने दावा केला होता की तिच्याबरोबर नात्यात असूनही त्या पुरुषाने दुसऱ्या मुलीबरोबर त्याची फसवणूक केली होती. ही गोष्ट २७ वर्षे मनात दाबून ठेवली होती. त्यामुळे आता ती बोलून मन हलकं झालंय.

कुनिका ज्या २७ वर्षांबद्दल बोलतेय, त्यावर काय म्हणायचंय? असं रीता भट्टाचार्य यांना विचारण्यात आलं. रीता म्हणाल्या, “तिने २७ वर्षांत काय केलं? २७ वर्षे ती काय करत होती? तिचं दुःख मनात दाबून ठेवलं होतं का? या दुःखद आयुष्यातील २७ वर्षांमध्ये तिला २६ वर्षांचा मुलगा देखील आहे ना? मग कसलं दुःख होतं? मी तर नाही ऐकलं की विवाहित असताना अफेयर करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तू एक आई आहेस. खरं तर मी कुमार सानूची बाजू घेत नाही आणि विरोधातही बोलत नाही. मला फक्त इतकंच म्हणायचंय की इतक्या वेदना असूनही तिचं लग्न झालं, २६ वर्षांचा मुलगा आहे मग २७ वर्षे काय लपवून ठेवलं? २७ वर्षांचं प्रेम मनात ठेवून लग्न करून एका मुलाची आई होऊ शकते. तिला २६ वर्षांचा मुलगा आहे. आमच्यात अशी संस्कृती नाही.”