Kushal Badrike and Shreya Bugde Video: अभिनेता कुशल बद्रिके हा त्याच्या विनोदातून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. विविध भूमिका, मिमिक्री व विनोदाचं अचूक टायमिंग यांमुळे कुशल लोकप्रिय ठरला आहे.
सध्या अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीच्या विनोदी कार्यक्रमात तो काम करीत आहे. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे, श्रेया बुगडे हे कलाकारदेखील दिसत आहेत.
श्रेया बुगडे, कुशल बद्रिके व भारत गणेशपुरे हे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागातदेखील दिसले होते. या कलाकारांमध्ये उत्तम मैत्री असल्याचे पाहायला मिळते. कुशल बद्रिके व श्रेया बुगडे अनेकदा एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत असतात. आता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“भुताच्या गेटअपमधेसुद्धा…”
कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडेदेखील दिसत आहे. ती वेगळ्या अवतारामध्ये दिसत आहे. लांब वेणी, त्यावर गजरा, थोडे केस विस्टकटलेले, कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा, गळ्यात दागिने, पिवळ्या रंगाची साडी, असा श्रेयाचा लूक आहे. ती म्हणते की, मी मंजोलिका आहे. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! त्यानंतर कुशल बद्रिकेदेखील दिसतो. तोदेखील वेगळ्या अवतारात दिसत आहे. तोदेखील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो.
हा व्हिडीओ शेअर करताना कुशलने लिहिले, “आता या श्रेया बुगडेला बघा. भुताच्या गेटअपमधेसुद्धा दिवाळीच्या कंदिलासारखी अगदी तेजस्वी दिसते.
पुढे अभिनेत्याने लिहिले, “मी पाहा स्फोट झालेल्या सुतळी बॉम्बसारखा दिसतोय. पण, दिवाळीची खरी मजा या दोन्ही गोष्टींशिवाय नाहीच. आज आम्ही तसेच दिसतोय म्हणून आम्हा दोघांकडून या अशा शुभेच्छा. आनंदी राहा, हसत राहा आणि तुमच्या वेडेपणात सामील होतील असेच मित्र जवळ बाळगा.”
नेटकरी म्हणाले…
कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सलील कुलकर्णी यांनी लिहिले, “तुम्हा दोन गोड माणसांना दीपावलीच्या शुभेच्छा”, तर नेटकऱ्यांनी लिहिले, “याला बोलतात खऱ्या दिवाळीच्या शुभेच्या”, “तुमका पन खूप खूप शुभेच्छा”, “हसवायचे सोडून सणासुदीला का घाबरवता तुम्ही”, “नशीब, रात्री हा व्हिडीओ पाहिला नाही”, “खूपच भयानक शुभेच्छा आहेत”, “भीत भीत तुम्हालापण शुभेच्छा”, “घरातून बाहेर येऊ नका. दिवाळीच्या शुभेच्छा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.




दरम्यान, सध्या हे कलाकार चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करीत आहे.