गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ लवकरच ऑफ एअर होणार आहे. लोकप्रियता अधिकच ओसरल्यामुळे आणि कमी टीआरपीमुळे हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २०१४ साली ‘लयभारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने जमलेली ही कलाकारांची भट्टी आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. अशातच सध्या अभिनेता कुशल बद्रिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुशलने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर विनोद केला आहे.

हेही वाचा – “…तर तुमची आडनावं मुल्ला, खान असती”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत म्हणाली…

कुशलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहीलं आहे, ‘प्लीज हा व्हिडीओ पूर्ण पाहा. आम्हाला कायम विचारलं जातं ‘चला हवा येऊ द्या’च्या चालू चित्रीकरणामध्ये काही ऐनवेळी घडतं का? त्याचं हे उत्तर.’ या व्हिडीओत, माझा वट्टा कार्यक्रम सुरू आहे. यादरम्यान पत्रकाराच्या रुपात असलेला कुशल बद्रिके अभिनेता प्रतिक लाडला विचारतो, ‘तुम्हाला एक पाच मिनिटं दिली आणि म्हटलं माझ्या मुलाला शाळेत गॅदरिंगमध्ये सादर करण्यासाठी एक नाट्यछटा लिहायची आहे, तर तेवढी तुम्ही लिहून देऊ शकालं का?’ यावर प्रतिक म्हणतो, ‘हे तर अजूनच अवघड झालंय.’ मग संपादकाच्या रुपात असलेले निलेश साबळे म्हणतात, ‘ते नाही म्हणतायत. तुम्ही कुठून माहिती काढली?

हेही वाचा – ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री ३५व्या वर्षी होणार आई; महाराष्ट्रीय पद्धतीत थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

यादरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिचा आणि सयाजी शिंदेंचा एक किस्सा सांगू लागते. ती म्हणते, ‘तुम्हाला मी एक सांगू. मी एक अशीच नाटिका जवळजवळ लिहिली आहे.’ तर कुशल म्हणतो, ‘अच्छा.’ पुढे सोनाली म्हणते, ‘तुम्ही मगाशी जे कॅरेक्टर झाला होता, सयाजी शिंदे. तर काय झालं, एका कार्यक्रमाला मी आणि सयाजी गेलो होतो आणि आमचं काहीतरी भलंतर चाललं होतं. कार्यक्रमाची ओळख करून देणारे मध्येमध्ये बोलणारे निवेदक वगैरे. तर मी सयाला (सयाजी शिंदे) एक प्रश्न लिहून चिठ्ठी पाठवली. तू अमुक-अमुक चित्रपट करणार आहेस का? तर त्याच्यावर त्याने मला चार-पाच ओळखीत उत्तर पाठवलं. दुसरीकडे ते बोलतायत आज हा सोन्याचा दिवस काहीतरी आणि मग मी परत काहीतरी त्याला वेगळा प्रश्न विचारला. मग तो मला कादंबरीचे संदर्भ द्यायला लागला आणि असं आमचं चिठ्ठी प्रकरण, काहीतरी वेगळं चालू होतं. दुसरीकडे कार्यक्रम संपूर्ण वेगळा चालू होता. माझ्याकडे अजून त्या चिठ्ठ्या आहेत हा, मी जपून ठेवलेत.’ यानंतर अचूक विनोदाची वेळ साधत कुशल म्हणतो की, ‘हे तुमच्याबरोबर आयुष्यात दुसऱ्यांदा घडतंय. आता कार्यक्रम वेगळा चालला आहे आणि तुम्ही बोलतायत ते वेगळं आहे.’ कुशलच्या या विनोदानंतर एकच हशा पिकतो.

हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठी मालिकाविश्वातील आहे लोकप्रिय खलनायिका

कुशलच्या या व्हिडीओवर श्रेया बुगडेने प्रतिक्रियेत लिहीलं आहे, ‘हा ब्रिलियंट टाकला होता… यार..क्लास…माझ्याकडून हे पण शिकलायस तू माहित नव्हतं…’ श्रेयाच्या या प्रतिक्रियेवर कुशल म्हणाला, ‘खरं आहे तुझं. माणूस कठीण परिस्थितीतूनच काही ना काही तरी शिकत असतो. खरं तर तुझी आणि सोनाली ताईची रिअ‍ॅक्शन एवढी खतरनाक आहे ना, सोनाली ताईने चेहरा झाकला आणि तू हसतेस… मी तोच कव्हर फोटो ठेवणार होतो…’

हेही वाचा – सुकन्या मोनेंनी सांगितले लग्नानंतर संजय यांच्यात झालेले बदल; म्हणाल्या, “खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत असला तरी पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व भेटीस येऊ शकते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते.”