Lagnanantar Hoilach Prem Latest Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. एकीकडे पार्थ व काव्यातील दुरावा संपला आहे, तर दुसरीकडे जीवा व नंदिनीच्या नात्याची परीक्षा सुरू आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा पुढच्या आठवड्यातील प्रोमो स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात आनंद निवासची बोली लागताना दाखवण्यात आलं आहे.
नंदिनीच्या ‘आनंद निवास’ची जागा विकली गेली आहे. तिला तिथून आनंद निवास खाली करण्यासाठी भास्करने १५ दिवस दिले होते. पण जीवाने त्याला मारहाण केल्यानंतर तो नंदिनीला फोन करून एका आठवड्यात आनंद निवास खाली करायला सांगतो. नंदिनीला आनंद निवास खाली करायचं टेंशन आहे, तर जीवाने मात्र काहीही करून आनंद निवासची जागा परत मिळवणार, असं ठरवलं आहे.
ताज्या एपिसोडमध्ये, विक्रम देशमुख नंदिनीला आनंद निवासचा १० वा वर्धापन दिन कसा झाला, असं विचारतात. त्यावर ती चांगला गेला म्हणत जीवावर असलेला विश्वास दाखवते. दुसरीकडे, जीवाला पिहूशी बोलताना काहीतरी आयडिया येते आणि तो उत्साहात तिथून निघून जातो. आता आनंद निवास वाचवण्यासाठी जीवा काय करणार ते प्रोमोत दाखवण्यात आलं आहे.
प्रोमोमध्ये नंदिनी म्हणते, ‘काय होणार उद्या लिलावाच्या दिवशी,’ यावर जीवा म्हणतो, ‘नंदिनी उद्या बोली लागेल माझ्या स्वप्नांची आणि मी मिळवेन तुझं आनंद निवास.’ पुढे भास्कर म्हणतो, ‘आनंद निवासच्या जागेची बोली लागतेय, किंमत सांगा.’ यावेळी नंदिनी रडवेला चेहरा करून हे सगळं बघत उभी असते. यानंतर समोर बसलेले लोक पाच करोड, आठ करोड असे आकडे बोलतात. शेवटी जीवा १० करोड असं म्हणतो.
पाहा प्रोमो-
यानंतर जमीन घेणारा म्हणतो, ५ करोडची जागा तू १० करोडला विकत घेतलीस, तुला खरंच व्यवहार कळत नाही जीवा. यावर “माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला व्यवहार मोठा नाहीये,” असं जीवा म्हणतो. शेवटी तो गुघड्यांवर बसून नंदिनीला आनंद निवासची चावी सोपवतो. “नंदिनी तुझं आनंद निवास” असं म्हणतो.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. ‘मस्त प्रोमो, आता तरी जीवा नंदिनीचा स्क्रीन टाइम वाढवा. काव्या मानिनीचा ड्रामा पाहून बोअर झालोय,’ ‘वेल डन जीवा.. आनंद निवास परत मिळवलंस’, ‘आता नंदिनी जीवाला माफ करेल आणि जीवा काव्याचं कोडं सोडवेल,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर प्रेक्षकांनी केल्या आहेत.