Lakhat Ek Aamcha Dada Fame Nitish Chavan Talks About MS Dhoni : नितीश चव्हाण हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. नितीश सोशल मीडियावरही सक्रिय असतो. यामार्फत तो त्याच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

नितीशने नुकतीच ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावलेली. या सोहळ्यादरम्यान वाहिनीवरील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से, गमती जमती, आठवणी सांगितलेल्या पाहायला मिळतात. अशातच नितीशनेही त्याच्या आवडी निवडींबद्दल तसेच त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल सांगितलं आहे.

नितीशला आवडतात ‘हे’ पदार्थ

‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नितीशने त्याला नाश्त्याला कोणते पदार्थ खायला आवडतात याबद्दल सांगितलं आहे. यावेळी अभिनेत्याला त्याच्या आवडत्या पदार्थांपैकी विचारल्यानंतर तो म्हणाला, “इडली, वडा सांबार, फोडणीचा भात, भाकरीचा चिवडा.”

नितीशला पुढे स्वप्न म्हणजे तुझ्यासाठी काय आहे असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “आपल्या आयुष्यात जे लोक आहेत, त्यांचा जर आपल्याला पाठिंबा असेल तर त्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला आपल्याला बळ मिळतं आणि काही आपले आयडॉल असतील तर त्यांच्या स्वप्नांपर्यंत कसे पोहोचता येईल ते बघून त्यांना फॉलो करून पुढे जात राहायचं.”

नितीशची एम एस धोनीबद्दल प्रतिक्रिया

नितीशला त्याच्या आयडॉलबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला एमएस धोनी आवडतो. त्याचा एक गुण मला खूप आवडतो, तो म्हणजे तो नेहमी विजयामध्ये मागे असतो आणि पराजयात पुढे असतो. त्याचा संयम आवडतो. फिल्डवर काम करण्याची त्याची जी एकंदरीतच पद्धत आहे ती मला खूप आवडते आणि त्याच्याकडून हे गुण मला घ्यायला आवडतील.”

दरम्यान, नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामधून त्याने सूर्या दादा ही भूमिका साकारत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली, त्यामुळे आता या मालिकेनंतर नितीश कोणत्या नवीन भूमिकेतून तसेच कोणत्या नवीन कलाकारांबरोबर झळकणार हे पाहणं रंजक ठरेल.