Lakhat Ek Aamcha Dada Fame Actor Shubham Patil : छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय होतात. ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या वर्षभरात या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. या शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याने चाहत्यांना नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत दत्तात्रयची ( दत्तू ) भूमिका साकारणारा अभिनेता शुभम पाटीलचा खऱ्या आयुष्यात साखरपुडा पार पडला आहे. होणाऱ्या पत्नीसह रोमँटिक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने सर्वांना साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. “आम्ही लवकरच मिस्टर अँड मिसेस पाटील होऊ” असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे.
शुभमने होणाऱ्या पत्नीसह शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडीओला “तू हवीशी मला…” हे गाणं लावलं आहे. याशिवाय पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने “साखरपुडा, ६ जून २०२५, लव्ह लाइफ, कपल गोल्स” असे हॅशटॅग्ज दिले आहेत.
शुभम व त्याच्या होणाऱ्या पत्नीने साखरपुड्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने पांढऱ्या कुर्त्यावर नारिंगी रंगाचा शेला घेतला होता. तर, त्याच्या पत्नीने साखरपुड्यात सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या जोडप्यावर सध्या कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील कलाकारांनी देखील शुभमला आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शुभमच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी तो ‘झी मराठी’च्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकेत झळकला होता. या मालिकेत हार्दिक जोशी व अमृता पवार प्रमुख भूमिकेत झळकले होते. तर, शुभमने यामध्ये मुख्य नायिका असलेल्या अदितीच्या मित्राची भूमिका साकारली होती. सध्या हा अभिनेता ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाते.