मराठी कलाकार हे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतातच, पण अनेकदा या कलाकारांचा साधेपणाही चाहत्यांना भावतो. मराठी कलाकार हे ग्लॅमरस इंडस्ट्रीत काम करत असले; तरी अनेकदा ही कलाकार मंडळी आयुष्यात अगदी साधेपणाने जगत असतात. मालिका, चित्रपटात स्टार असणारे हे कलाकार वैयक्तिक आयुष्यात अगदी साधेपणाने आयुष्य जगत असतात.
अशाच साधेपणा जपणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राजश्री निकम. राजश्री निकम या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्याचबरोबर कामानिमित्तची माहितीही शेअर करत असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
राजश्री यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ शेतीकामाचा आहे. राजश्री निकम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ त्या कापणी करतानाचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी शेती आणि एन्जॉय असंही म्हटलं आहे. राजश्री निकम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या आनंदाने शेतीकाम करत असतानाचे पाहायला मिळत आहे. राजश्री निकम यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राजश्री निकम इन्स्टाग्राम व्हिडीओ
अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी अभिनेत्रीच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही राजश्री यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अश्विनीने ‘ताई’ अशी कमेंट करत अभिनेत्रीच्या कृतीचं कौतूक केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री सारिका नवाथे यांनीसुद्धा हा व्हिडीओ आवडला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, राजश्री निकम या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत त्या सुर्यादादाच्या आईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
दरम्यान, राजश्री यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी याआधी ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘लाडाची मी लेक गं’, ‘मोलकरीण बाई’, ‘एक घर मंतरलेलं अशा काही मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. याशिवाय त्यांनी ‘सोयरीक’ आणि ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी चॉकलेट’ या चित्रपटांतही काम केलं आहे.