काही मालिका या कमी वेळात प्रेक्षकांच्या लाडक्या होतात, त्यापैकीच एक ‘लक्ष्मी निवास’ (Lakshami Niwas) ही मालिका आहे. अनेक लोकप्रिय कलाकार या मालिकेत काम करताना दिसत आहेत. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, दिव्या पुगावकर, मेघन जाधव, निखिल राजशिखरे असे अनेक कलाकार या मालिकेत काम करताना दिसत आहेत. लक्ष्मी व श्रीनिवास यांचे स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न आहे. याबरोबरच मुलींची लग्न थाटामाटात व्हावी, असेही त्यांना वाटते. काही दिवसांपूर्वीच जान्हवीचे मोठ्या थाटामाटात लग्न झाल्याचे पाहायला मिळाले. आता जान्हवी व जयंतच्या संसाराला सुरुवात झाली असून जान्हवीवर टिप्पणी केल्यामुळे जयंत व काही गुंडांमध्ये वाद निर्माण होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले.

गुंडांनी जान्हवीची छेड काढल्याचे पाहताच जयंतचा संताप अनावर

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जयंत व जान्हवी कारमधून जात आहेत. जयंत जान्हवीला म्हणतो की, तू माझ्याशिवाय बाहेर पडलेली अजिबात आवडत नाही. त्यावर जान्हवी म्हणते की, किती काळजी करतोस ना माझी? तितक्यात जान्हवीला रस्त्यावर भेळचे दुकान दिसते. ती जयंतला विचारते की आपण भेळ खाऊयात का? त्यावर जयंत म्हणतो की तुला भेळ आवडते तर आपण आज भेळच खाऊ. त्यानंतर जयंत तिच्यासाठी भेळ घेऊन येतो. तो तिला ती भेळ भरवतो, तितक्यात त्यांच्या कारजवळ काही गुंड येतात व जयंतला म्हणतात की काय राव, फक्त तुम्हीच हिला भेळ भरवणार का? जरा आम्हालासुद्धा संधी द्या की. असे म्हणत ते विचित्र पद्धतीने हसतात. ते ऐकून जयंतला राग येतो. तो गाडीतून बाहेर येत असतो, तर जान्हवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. जयंत तिचे न ऐकता गाडीबाहेर येतो. रागाने तो ए असे म्हणतो. त्यावर एक जण म्हणतो, का राग आला का? असे म्हणत ते सर्व गुंड पुन्हा हसतात. जयंतच्या चेहऱ्यावर संताप दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने “जान्हवीची छेड काढणाऱ्या गुंडांना जयंत शिकवणार धडा!” अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत जयंत-जान्हवीचे लग्न काही दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात पार पडल्याचे पाहायला मिळाले. सिद्धू भावनाच्या प्रेमात पडली आहे, तर विश्वा जान्हवीचे लग्न झाल्यामुळे दु:खात आहे. जयंत जान्हवीची काळजी घेत असला तरी तो अनेकदा अतिशोयक्ती करत असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार, जयंत जान्हवीची छेड काढणाऱ्यांना कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.