Zee Marathi Lakshmi Niwas Serial New Entry : ‘झी मराठी’वर नुकतीच ‘लक्ष्मी निवास’ ही महामालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची इच्छा असते. अगदी त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी एक स्वप्न पाहिलेलं असतं. आता या दोघांचं स्वप्न सत्यात उतरणार की नाही? याचा प्रवास ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून उलगडला जाणार आहे.

‘झी मराठी’च्या या नव्या ( Lakshmi Niwas ) मालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी यांच्यासह अक्षया देवधर, दिव्या पुंगावकर, निखिल राजेशिर्के, मीनाक्षी राठोड, स्वाती देवल असे अनेक कलाकार या मालिकेत झळकले आहेत. आता लवकरच यामध्ये एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा : ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…

‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धीराजचं गाडेपाटील आहे तरी कोण?

‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा लॉन्च सोहळा पार पडला होता. यावेळी मालिकेतील चार कलाकारांच्या भूमिका उघड करण्यात आल्या होत्या. हर्षदा, तुषार आणि अक्षया यांच्यासह आणखी एक अभिनेता या सोहळ्याला उपस्थित होता. त्याचं नाव आहे कुणाल शुक्ला. ‘लक्ष्मी निवास’मध्ये लवकरच कुणालची एन्ट्री होणार आहे.

कुणालच्या एन्ट्रीचा जबरदस्त प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धीराज गाडेपाटील या दबंग नेतृत्वाची एन्ट्री होणार आहे. याच सिद्धीराजची भूमिका कुणाल साकारणार आहे. प्रोमोमध्ये सिद्धीराजचं गाडेपाटील घराणं राजकारणात सक्रिय असून त्याला सगळे सिद्धू दादा म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : कधी ब्लॅकमध्ये तिकिटं विकली; तर कधी केलं स्पॉटबॉयचं काम, ‘असा’ आहे अनिल कपूर यांचा बॉलीवूडमधील प्रवास; जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सिद्धीराज गाडेपाटीलच्या एन्ट्रीनंतर मालिकेत काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ( Lakshmi Niwas ) मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, ही मालिका २३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. दररोज रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल. तर, यापूर्वी ८ वाजता सुरू असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची वेळ आता बदलण्यात आली आहे.