Laxmichya Paulanni Fame Akshar Kothari’s New Car : यंदाच्या नवीन वर्षात अनेक कलाकारांनी नव्या घरात गृहप्रवेश केला, काहींनी नव्या बिझनेसची सुरुवात केली तर, काही सेलिब्रिटींच्या घरी नव्याकोऱ्या गाडीचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. आता मालिकाविश्वात सक्रिय असणाऱ्या आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हा अभिनेता म्हणजेच अक्षर कोठारी. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेमुळे हा अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या नव्या वर्षात अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केली आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अक्षर कोठारी अद्वैत चांदेकर ही प्रमुख भूमिका साकारत आहे. यापूर्वी सुद्धा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अक्षरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेता त्याच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आला आहे. अक्षरने जीप कंपास ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अक्षरने नव्या गाडीची पूजा करून, पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अक्षरने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याच्या गाडीचं नाव ‘जीप कंपास मॉडेल एस’ असं नमूद केलं आहे. ‘फायनान्सशिअल एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, या गाडीची किंमत २८.३३ लाख ( एक्स शोरुम ) ते ३२.४५ लाख इतकी आहे.

अक्षरच्या नव्या गाडीच्या व्हिडीओवर तेजश्री प्रधानने कमेंट करत, “वेलकम टू द फॅमिली, जीप कंपास…गूड चॉइस” असं म्हटलं आहे. तर, अभिषेक रहाळकर, अपूर्वा नेमळेकर, आशुतोष गोखले, मुग्धा कर्णिक, सुमीत पुसावळे, चेतन वडनेरे, शिल्पा नवलकर, किशोरी अंबिये, मंदार जाधव या सगळ्या कलाकारांनी कमेंट्स करत अक्षरचं या नव्या गाडीसाठी कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षर कोठारीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेली अनेक वर्षे तो कलाविश्वात सक्रिय आहे. ‘कमला’, ‘छोटी मालकीण’, ‘चाहूल’ अशा मालिकांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सध्या अक्षर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.