‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री माधवी निमकर घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेलं ‘शालिनी’ हे पात्र नकारात्मक असलं तरीही प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. इंडस्ट्रीत पदार्पण केल्यापासून अभिनेत्रीने आपल्या फिटनेसकडे काटेकोरपणे लक्ष दिलं. त्यामुळे माधवीच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. अभिनेत्री नुकतीच राजश्री मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्य, इंडस्ट्रीतील प्रवास व यादरम्यान आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं.

माधवीने कोणाचंही पाठबळ नसताना संघर्ष करून या इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या काही वर्षांमध्ये तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. या सगळ्या प्रवासात माधवीला अनेक वाईट अनुभव देखील आले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत सांगितलं. इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी सांगताना माधवी म्हणाली, “माझ्याबद्दल असंही म्हटलं जातं की, हिचं शरीर नकली आहे, खोटं काहीतरी करून हिने कृत्रिम शरीर बनवलंय. काहीजण असंही म्हणतात मी लिपोसेक्शन वगैरे केलंय असं सगळं माझ्याबद्दल बोलण्यात येत आणि या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत.”

हेही वाचा : पूजा सावंतने होणाऱ्या नवऱ्यासह पाठमोरे फोटो का शेअर केले? अभिनेत्री म्हणाली, “भूषण किंवा वैभव…”

माधवी पुढे म्हणाली, “काही जणांना वाटतं मी काही कॉस्मेटिक सर्जरी करून घेतल्या आहेत. पण, हे सगळं खोटं आहे. लोकांच्या अशा नकारात्मक कमेंट्स ऐकून मला नेहमी हसायला येतं. माझ्या जवळच्या माणसांना मी फिटनेससाठी किती मेहनत घेतलीये हे चांगलंच माहिती आहे. हे सगळं मी कमावलंय. त्यामुळे अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही. उलट मला कौतुक या गोष्टीचं वाटतं मी एवढी छान दिसतेय की, लोक माझ्या दिसण्याविषयी शंका घेऊ लागले आहेत. हे केवळ माझ्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे.”

हेही वाचा : केदार शिंदे – हरहुन्नरी दिग्दर्शकाची बहुढंगी सफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधवी निमकरने आजवर ‘हम तो तेरे आशिक है’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेत्री ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.