सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. मराठीसह हिंदी आणि साऊथच्या अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक कलाकारांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- बाप्पाची खास मूर्ती, मराठीतून आरती अन्…, देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं होतंय कौतुक

कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात तिचं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरी देखील सोशल मीडियावरून त्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. माधुरीने इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे.

‘डान्स दीवाने-३’च्या सेटवर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. या क्रार्यक्रमात माधुरी परिक्षक म्हणून काम पाहत आहे. या सेटवरील बाप्पाचा फोटो पोस्ट करत माधुरीने लिहलं आहे. “बाप्पाच्या आगमनला सजली सर्व धरती नसानसात भरली स्फुर्ती आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची. गणेश चतुर्थी शुभेच्छा!”

हेही वाचा- गुलाबी कुर्ता, पायात कोल्हापुरी अन्…, गणेश चतुर्थीनिमित्त ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला पोहोचला बॉलीवूड अभिनेता; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी माधुरीने तिच्या दोन्ही मुलांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. माधुरीची दोन्ही मुलं आता कॉलेजला आहेत. ती परदेशात शिक्षण घेतात. सुट्टी संपून आता ती पुन्हा एकदा परदेशात गेल्याने माधुरी भावूक झाली होती. तिने तिच्या दोन्ही मुलांबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “माय बॉईज… तुम्ही दोघेही आता कॉलेजमध्ये आहात. वेळ कसा निघून गेला कळलच नाही. पण तरीही तुमचा प्रवास पाहण्यासाठी उत्तम माणूस घडताना तुम्हाला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला खूप मिस करेन. तुमच्या दोघांशिवाय हे घर अपूर्ण असेल.”