डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दिवाने ४’ हा टीव्हीवरील लोकप्रिय शो होता. या शोचा धमाकेदार ग्रँड फिनाले पार पडला असून शोला विजेता मिळाला आहे. या शोच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. गौरव-नितीन या स्पर्धकांनी शोचे विजेतेपद पटकावले आहे. माधुरी दीक्षित व सुनील शेट्टी या शोचे परीक्षक होते.

‘डान्स दीवाने ४’ हा शो सुमारे साडेतीन महिने चालला आणि लोकांचे मनोरंजन केले. हा शो खूप लोकप्रिय होता. प्रेक्षकही या शोच्या एपिसोड्सची आतुरतेने वाट पाहत असायचे. पण आता शोच्या चौथ्या पर्वाला विजेता मिळाला आहे. या शोच्या ट्रॉफीसाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. अंतिम फेरीत सहा जोड्यांनी एकमेकांना टक्कर दिली. यात गौरव आणि नितीन विजेते ठरले. या दोघांना ट्रॉफीसह २० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!

कोणत्या पाच जोड्यांना विजेत्यांनी टाकलं मागे

गौरव व नितीन यांनी युवराज आणि युवांश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनजोत यांना मागे टाकत बाजी मारली आणि शोचं विजेतेपद पटकावलं. गौरव आणि नितीन या लोकप्रिय शोच्या चौथ्या पर्वाचे विजेते ठरले आहेत.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

वेगवेगळ्या राज्याचे आहेत दोन्ही विजेते

या शोचे दोन्ही विजेते वेगवेगळ्या राज्याचे आहेत. गौरव २२ वर्षांचा असून तो दिल्लीचा आहे. तर नितीन १९ वर्षांचा आहे, तो बंगळुरूचा आहे. नितीन आणि गौरव दोघांनी ‘डान्स दिवाने’साठी स्वतंत्र ऑडिशन दिल्या होत्या, पण नंतर त्यांनी एकत्र परफॉर्मन्स दिले. गौरव आणि नितीन दोघांनाही एकमेकांच्या राज्याची भाषा कळत नव्हती. पण त्या अडथळ्यांवर मात करत ते एकत्र डान्स करत राहिले. या दोघांनी आपल्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली व त्यांनी हे पर्व जिंकलं.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

२० लाख रुपयांचं काय करणार गौरव व नितीन

शो जिंकल्यानंतर गौरव आणि नितीन खूप खूश आहेत. या दोघांनी जिंकलेली रक्कम निम्मी निम्मी करून घेतली आहे. विजयानंतर दोघांनी ई-टाइम्सशी बोलताना बक्षिसाच्या रकमेचे काय करणार आहेत याबाबत सांगितलं. नितीन म्हणाला की जिंकलेली रक्कम तो त्याच्या आई- वडिलांना देणार आहे. याशिवाय काही रक्कम तो देणगी म्हणून देणार आहे.

गौरव म्हणाला की तो या पैशांनी गर्लफ्रेंडबरोबर फिरायला जाणार आहे. तसेच त्याच्या वडिलांनी त्याला प्रमोट करण्यासाठी कर्ज घेतलं होतं, ते कर्ज तो फेडणार आहे. याशिवाय एक कार घ्यायची त्याची इच्छा आहे.