‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. ‘अंकुश’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच हास्यजत्रेच्या सेटवर बॉलीवूडचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी हास्यजत्रेच्या नायिकांबरोबर डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर पुन्हा एकत्र, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आणि ईशा डे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऋतुजा बागवे, प्राजक्ता माळी, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, चेतना भट, ईशा डे या नायिका गणेश आचार्य यांच्यासह डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा : “भक्तांचा अपमान…”, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका अचानक बंद; प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, म्हणाले….

बॉलीवूडच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. आलिया-रणवीरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील गाण्यांच्या हुक स्टेप्स सुद्धा गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. याच ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर हास्यजत्रेच्या नायिका थिरकल्या.

हेही वाचा : अस्मिता-प्रियाचा नवा डाव, पूर्णा आजीला भडकवणार अन्…, ‘ठरलं तर मग’च्या विशेष भागात काय होणार? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हास्यजत्रेच्या नायिकांनी ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर बॉलीवूडचे मास्टरजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश आचार्य यांच्याबरोबर डान्स केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या नायिकांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये नम्रता संभेराव आणि शिवाली परबदेखील पाहिजे होत्या अशी इच्छा काही नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये व्यक्त केली आहे.