‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर व्हिडीओ बनवत आहे. संजू राठोडच्या या गाण्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे.

माधुरी दीक्षित, प्रार्थना बेहेरे, प्रिया बापट- उमेश कामत, दिपाली सय्यद यांच्या पाठोपाठ आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव देखील ‘गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली आहे. या व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा तिचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : फक्त १५ मिनिटांची डेट अन् सायली चालवणार स्कूटर, मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?

केसात गजरा, गुलाबी रंगाची इरकल साडी असा मराठमोळा लूक करून नम्रताने ‘गुलाबी साडी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. तिचे सगळे चाहते आता या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ऋतुजा बागवे, सारंग साठ्ये, अश्विनी कासार या कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत नम्रताचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “Happy birthday राव”, नवऱ्याच्या वाढदिवशी मृण्मयी देशपांडेची खास पोस्ट; म्हणाली, “तुझ्या पाठीशी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अवघ्या काही तासांतच नम्रताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती ‘नाच गं घुमा’ चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.